Type to search

maharashtra आवर्जून वाचाच गणेशोत्सव जळगाव मुख्य बातम्या

पारोळ्यास विसर्जन श्रीगणेशाचे : रक्षण पर्यावरणाचे” उपक्रमास प्रतिसाद

Share

पारोळा. प्रतिनिधी :   येथील गणेश भक्तांना जलप्रदूषण वाचविण्यासाठी एक नवीन शक्कल शहरातील काही तरुणांनी संकल्पना व आयोजन केलेले असून सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले होते त्यास चांगला प्रतिसाद मिळत असून छोटे गणपती बाप्पाचे विसर्जन या शुद्ध पाण्याच्या टाकिंमध्ये केले जात आहे.

दरवर्षी गणेश मूर्ती ची विक्री होते त्यात जास्तीत जास्त मुर्त्या ह्या प्लास्टिक पॅरिस पासून व रासायनिक रंगापासून बनविलेल्या असतात त्यामुळे विसर्जन करण्यात येणारे जलसाठे दूषित होतात तसेच या मूर्तींचे वेगवेगळे भाग होऊन आपल्याकडूनच बाप्पाचे विटंबना होते .ते थांबविण्यासाठी शहरातील अमळनेर रस्त्यावरील शनिमंदिराजवळ,न.पा.चौकात,कजगाव नाका या तीन ठिकाणी मोठ्या टाक्या ठेवण्यात आलेल्या असताना आज दि.२३ रोजी सकाळपासून याठिकाणी गणेश मूर्तींचे विसर्जन भटजीकडून विधिवत पध्दतीने पूजा अर्चा करून केले जात असून विनंतीस मान देऊन छोट्या मंडळांनी,घरगुती गणेश भक्तांनी या ठिकाणी विसर्जन करण्याचे आवाहन मयूर मालपुरे, अमोल शिरोळे, प्रा.विकास सोनवणे, अभय पारख यांनी केले होते त्यास उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!