Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या राजकीय

आंबेडकर – ओवेसी युती भाजपाच्या पथ्यावर : उध्दव ठाकरे

Share
मुंबई : राज्यात व केंद्रात अनेक वर्षापासून भाजपा व शिवसेना आणि कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेस यांची युती चालत आलेली आहे. या युतीत इतर लहान पक्षचा पाठिंबा मिळत होता. कालपरवापर्यत आंबेडकर व ओवेसी हे दोघेही पडद्याआडून भाजपाच्या सोईच राजकारण करत होते. आता मात्र ते दोघे हाता हात घालून 2019 च्या निवडणूका लढवून ताकद दाखवत त्याचा फायदा भाजला करून देणार आहेत. त्यासाठीच ही अभद्र युती झाली आहे अशी टिका शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली आहे.

काय म्हणतात श्री. ठाकरे

एमआयएम हा मुस्लिम लीगचा भ्रष्ट अवतार आहे व मुसलमानांच्या व्होट बँकेचे राजकारण करून देशात फुटीची बीजे रोवण्याचे त्यांचे काम सुरू आहे. ‘‘पंचवीस कोटी मुसलमान हिंदूंना भारी पडतील. पोलिसांना दूर ठेवा, आम्ही हिंदूंच्या कत्तली करू’’ अशी कसाईछाप भाषा वापरणार्‍या ओवेसीशी हातमिळवणी करून प्रकाश आंबेडकरांनी दलित समाजाला नव्या खड्ड्यात ढकलले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या समाज बांधवांसाठी अमृताचा प्याला दिला. त्यात विष कालवण्याचे काम करू नका. अर्थात कोणी कितीही मांडीवर थापा मारल्या तरी दलित समाज व राष्ट्रवादी मुसलमान हा शहाणाच आहे. नव्या अभद्र युतीकडे तो वळणार नाही. महाराष्ट्रातील दलित संघटना या सत्ताधार्‍यांच्या दावणीला कायम बांधलेल्या असतात व समाजापेक्षा स्वतःचेच हित ते पाहत असतात. कोणत्याही रिपब्लिकन नेत्याला जनाधार नाही व अस्मिता नाही. जातीधर्माच्या नावाने त्यांचे चांगभले सुरूच असते. प्रकाश आंबेडकर ओवेसीच्या तंबूत गेले त्यातून त्यांचाच खरा चेहरा उघड झाला.

त्या दोघांचे एकत्र येणे हे भारताच्या राजकारणासाठी शुभसंकेत नाहीत. आंबेडकर व ओवेसी यांनी उघडपणे भारतीय जनता पक्षाबरोबर जायला हवे होते, पण ‘वंचित बहुजन आघाडी’च्या नावाखाली आंबेडकर-ओवेसी यांनी नवा तंबू टाकला आहे.

ओवेसीची भाषा अस्थिरता आणि अराजक निर्माण करणारी असते. ती प्रकाश आंबेडकरांना मान्य आहे काय? त्यांना दलितांचे न्याय्य हक्क हवे आहेत, पण म्हणजे नक्की काय हवे आहे? दलितांची माथी भडकवायची. त्यांच्या मनात अशांततेचे विचार टाकायचे व राज्यात दंगलींचा धूर काढायचा, असा ओवेसीबरोबरच्या आघाडीचा अर्थ उद्या कोणी काढला तर त्याचे काय उत्तर प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आहे?

पुन्हा रोटी, कपडा व मकान यासाठी त्यांच्या आघाडीकडे काय कार्यक्रम आहे? बेरोजगारीवर कोणता उतारा आहे? दलित वस्त्यांतील राजकारण भडकत ठेवायचे व आपापसात दुही माजवायची हे सर्व दलित संघटनांचे आजवरचे धोरण राहिले आहे.

‘दलितांनी दलित म्हणूनच डबक्यात राहावे व मुसलमानांनी देशाचे नागरिक म्हणून नाही, तर फक्त मुसलमान म्हणूनच जगावे यासाठी डबकी तयार केली जातात. प्रकाश आंबेडकर व ओवेसी यांनी एकत्र येऊन नवे डबके तयार केले आहे. दलित व मुसलमानांनी एकत्र येऊन ही डबकी उधळून लावली पाहिजेत. २०१९च्या निवडणुकीत कुणाला ‘चारायचे’ व कुणाला ‘पाडायचे’ यासाठी ठरवून टाकलेला हा डाव आहे’, असा आरोप उद्धव यांनी केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!