Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

आता सरकारवर अपेक्षा न ठेवता श्रमदानाने रस्ते दुरुस्त करावी लागतील-नाथाभाऊचा सरकारला कानपिचक्या 

Share
रावेर |प्रतिनिधी  :  नाथाभाऊ पालकमंत्री असताना कामे सांगण्याची गरज नव्हती,सर्व कामे वेळेत व्हायची आता कुठलेही कामे होत नसल्याने जनता आक्रोश करत आहे. आज आणि उद्या काम होतील ही भावना ठेवून पक्षाला मतदान करत आहे. गेल्या वेळी आमदार हरिभाऊ यांना अहिरवाडी रस्त्यावरून नागरिकांनी धारेवर धरले होते. हा धागा पकडून,शनिवारी एकनाथ खडसे यांनी सरकार बाबत रोष व्यक्त केला.
ते म्हणाले की,हरिभाऊ जावळे उद्विग्न होऊन राजीनामा द्यायला निघाले होते. मुख्यमंत्र्यांना दोनदा-तीनदा भेटले,एकदा माझ्या समोर पण भेटले, मात्र सरकार कडे पैसे नसल्याचे सांगून कामे होत नाही.शेजाऱ्याच्या राज्यात नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानापोटी,शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत केली जाते; तेव्हा आपल्या कडील शेतकरी विचारतात भाऊ तिकडे पण आपले सरकार आहे,राज्यात सुद्धा आपलेच आहे मग हा परकेपणा का? तेव्हा,मीच हरिभाऊ यांना सांगितले तुम्ही पण राजीनामा द्या,मी पण देतो.
कामे कॉंग्रेस च्या काळात दणका मारताच होत होती,आता मात्र आपलेच सरकार असल्यावर होत नाही,रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झालेली आहे.सरकार काही करत नसेल तर आता आपण श्रमदानाने आपण कामे करू,यासाठी आता हरिभाऊ यांनी फावडे घ्यावे,मी घेमेले घेतो आपण श्रमदान करून रस्ते सुधारू,अशा मार्मिक शब्दात नाथाभाऊनी सरकार वर निशाना साधला.
     तालुक्यातील रमजीपूर येथे शनिवारी पाल-केऱ्हाळे गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर खासदार रक्षा खडसे,आमदार हरिभाऊ जावळे,माजी खा.डॉ. गुणवंतराव सरोदे,जिल्हा अध्यक्ष उदय वाघ,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन,सुरेश धनके,जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, तालुका अध्यक्ष सुनील पाटील,जि.प.सदस्या रंजना पाटील,नंदा पाटील,कैलास सरोदे,पंचायत समितीचे गटनेते पी. के.महाजन पं.स.सदस्य जितू पाटील,धनश्री सावळे,महीला आघाडी तालुका अध्यक्षा नेहा गाजरे,अमोल पाटील,कृऊबा संचालक गोपाळ नेमाडे,श्रीकांत महाजन,संजय निराधार समितीचे अध्यक्ष शिवाजी पाटील,माजी उपसभापती महेश पाटील,सरचिणीस महेश चौधरी,वाघोद्याचे माजी सरपंच कालू मिस्तरी व पदाधिकारी उपस्थित होते.
  खडसे पुढे म्हणाले की,कृषी मंत्री असताना केळी पिक विम्याचा लाभ मिळवून दिला,केळी पट्टयात यामुळे हेक्टरी ५० हजारापर्यंत मदत दिली गेली.ह्या कामाबाबत कार्यकर्त्यानी जनतेला माहिती द्यावी.२३ सप्टेंबर रोजी पंतप्रधान हेल्थ कार्ड देत आहे.यातून देशातील ५० कोटी जनतेला,५ लाख पर्यंत मोफत उपचार मिळेल असेही त्यांनी सांगितले,यावेळी जिल्हा अध्यक्ष उदय वाघ,खासदार रक्षा खडसे,आमदार हरिभाऊ जावळे ,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, यांनी देखील मनोगते व्यक्त केली.
[button color=”” size=”” type=”round” target=”” link=””]नाथाभाऊ उदय बापू यांना उद्देशून म्हणाले की,कामे होत नाही यासाठी आम्ही तुमच्या कडे तक्रार करत आहे.तुम्ही मध्यस्थी करावी असा टोला मारून सरकाच्या निष्क्रीयेतेचा पाढा वाचला,पुढे त्यांनी मोर्चा जिल्हा परिषद वर वळवला यावेळी नंदू महाजन आशेचा किरण आहे.त्यांनी तरी कामे करून आमची समस्या सोडवावी असे सांगितले.[/button]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!