सेवाज्येष्ठता, पदोन्नतीपासून शिक्षक वंचित

0

जळगाव । शासन मान्यताप्राप्त खासगी व नगरपालिका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील सेवाजेष्ठता सूची शासन परिपत्रकाप्रमाणे निकाली काढण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत. मात्र शाळांनी या निर्णयाबाबत संभ्रम असल्याचे दाखवत कार्यवाही करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे अनेक शिक्षकांना सेवाज्येष्ठता व पदोन्नती पासून वंचित रहावे लागत आहे.

शिक्षक सेवाज्येष्ठतेबाबत सेवा ज्येष्ठता सूची व पदवीधर शिक्षकांची वेगवेगळी सुची ठेवण्याबाबत शासनाने 14 नोव्हेंबर 2017 रोजी परिपत्रक काढले. परिपत्रकाप्रमाणे कार्यवाही करावी म्हणून शिक्षणाधिकारी कार्यालयाने शाळांना आदेश दिले. ृआदेशाचा अर्थ स्पष्ट असला तरी शाळांनी संभ्रमाचा दिखावा करीत कार्यवाहीस टाळाटाळ केली. त्यामुळे अनेक पदवीधर शिक्षकांना सेवा ज्येष्ठता व पदोन्नती मिळाली नाही.

त्यामुळे त्यांनी शिक्षण विभागाकडे तक्रारी दाखल केल्या. पात्र शिक्षक सेवाज्येष्ठता व पदोन्नतीपासून वंचित राहत आहे. शासनाच्या निकषाप्रमाणे पदवीधर ज्येष्ठता सूची ही संबंधित शिक्षकास पदवीधर वेतनश्रेणी मान्य करण्यासाठी विचारात घ्यावी. सामाईक ज्येष्ठतासूची ही पदोन्नतीच्या प्रयोजनार्थ विचारात घ्यावी. पदवी मान्यता ही शैक्षणिक स्वरुपाची पदवी असून प्राथमिक शिक्षक पदासाठी आवश्यक अर्हतेशिवाय त्या-त्या पदासाठीची अधिकची अर्हता आहे. पदवी प्राप्त केल्यानंतर संबंधित शिक्षकाचा पदवीधर शिक्षकांच्या यादीत समावेश होईल.

या यादीतील त्यांचा ज्येष्ठतेचा दिनांक हा अखंड सेवेतील शिक्षक पदावरील प्रथम नियुक्तीचा जो दिनांक असेल तोच राहिल. आदी निकष नमूद करण्यात आले आहेत. मात्र शाळांकडून शासनाच्या या आदेशाकडे कानाडोळा केला जात आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांनी पगार बिलांसोबत शासननिर्णयानुसार सेवाजेष्ठता यादी मागविण्यात यावी अशी मागणी डी.एड पदवीधर शिक्षकांनी होत आहे.

LEAVE A REPLY

*