अनुकंपा भरतीला 15 दिवसांचा अवधी

0

जळगाव । जिल्ह्यातील अनुकंपाधारकांना जि.प. प्रशासनाकडून गेल्या तीन वर्षांपासून न्याय मिळत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवसांपासून साखळी उपोषण सुरु केले आहे. अखेर आज शिक्षण सभापती पोपट पोळे यांच्या पुढाकारातून जि.प. प्रशासनाने उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पंधरा दिवसात भरती प्रक्रिया सुरु करण्याच्या आश्वासनाने उपोषण सोडण्यात आले.

जि.प. शिक्षण सभापती पोपट भोळे यांसह सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.एस. अकलाडे, जि.प. सदस्या पल्लवी देशमुख यांच्या यांनी आज उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. जिल्हा परिषदे अंतर्गत अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये वर्ग ‘क’ व ‘ड’ श्रेणीमध्ये 2005 पासून समाविष्ट असून शासन निर्णयानुसार दरवर्षी रिक्त होणार्‍या पदानुसार भरती प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. सन 2015 मध्ये शासनाच्या सुचनेनुसार गट ‘क’ व ‘ड’ च्या एकूण 128 पदांची भरती करण्यात आलेली नाही.

हि अनुकंपा भरती सन 20016 मध्ये करण्याबाबत प्रक्रिया सुरु करण्यात आली. ऑगस्ट 2017 रोजी ग्रामविकास व जलसंधारण विभागातील अव्वर सचिव भरत पाटील यांच्या आदेशान्वये ऑगस्ट महिन्यात अनुकंपा धारकांची कागदोपत्री पडताळणी तसेच सप्टेंबर महिन्यात गटविकास अधिकारी यांच्याकडून गृहभेट चौकशी करण्यात येऊन इतर कार्यवाही पुर्ण झालेली आहे. दि.3 एप्रिल 2018 रोजी रोजी ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडून जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहे. याला चार महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झालेला असून भरती प्रक्रियेला चालढकल होत आहे. त्यामुळे दि.10 रोजीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरु केले होते.

आज जि.प. प्रशासनाने उपोषणकर्त्यांची भेट घेऊन लेखी आश्वासन देण्यात आले आहे. याप्रसंगी मायादेवी चव्हाण, दिनेश देवराज, तुषार चौधरी, अमजद खान, चेतन कुरकुरे, सुनिल कोळी, ललित साबे, तन्वीर तडवी, दगा पाटील, भुषण पाटील, सागर सावळे, मनिष खैरनार, मनोज खैरनार, मनिष सोनार, भरत धांडे, असीम तडवी, जगदीश भदाणे, प्राजक्ता गायकवाड, जनार्दन चव्हाण आदी उपस्थित होते.

सीईओंशी चर्चा करुन कार्यवाही होणार!
अनुकंपाधारकांची भेट घेण्यात येऊन त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या. यात सुधारित शासननिर्णयानुसार 20 टक्के जागा अनुकंपाधारकांच्या भरण्याबाबत सीईओंशी चर्चा करुन 30 तारखेपर्यंत निर्णय घेण्यात येईल. तसेच शुक्रवारी कॅम्प लावण्यात येणार आहे. यात काहींचे शिक्षण कमी असल्याने त्यांना परिचर पदावर घेण्याबाबत कार्यवाही केली जाईल.
– बी.एस. अकलाडे,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
सामान्य प्रशासन, जि.प.

LEAVE A REPLY

*