आगग्रस्तांनी रस्त्यावर जागून काढली रात्र

0
जळगाव । शहरातील तांबापुरा, फुकटपुरा भागातील पंचशिल नगरात शॉटसर्कीट झाल्याने सिलेंडरचा स्फोट होवून 17 पार्टीशनची घरे जळून खाक झाल्याची घटना घडली. या घटनेत डोळयासमोर आगग्रस्त कुटुंबियांच्य संसाराची राखरांगोळी झाली.

त्यामुळे आगग्रस्त कुटुंबियांनी इच्छादेवी मंदिर परिसरासह रस्त्यावर जागून रात्र काढली. आगीतून बाहेर काढलेला सामान तसेच सिलेंडर अज्ञातांनी चोरून नेल्याचे प्रकार घडल्याने आगग्रस्त कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान प्रशासनाकडुन प्रत्येकी पाच हजार रुपये व आ.राजुमामा भोळे यांच्याकडुन जीवनावश्यक सामग्री देण्यात आली. माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांनी आगग्रस्त कुटुंबियांची भेट घेवुन आर्थिक मदत केली.

पंचशिल नगरात शॉटसर्कीटमुळे सिलेेंडरचा स्फोट होवून सोमनाथ दिपक शिरसाठ, गणेश दिपक शिरसाळ, सखुबाई दिपक शिरसाठ, पवन किसन हटकर, भिमराव शंकर मोरे, गंगाराम किसन साठे, गौतम सोनू सुरवाडे, बेबाबाई सोनू सुरवाडे, छायाबाई विजय बोदडे, रविंद्र मोरे, जुबेर शेख शब्बीर, संगीता रमेश जाधव, इम्रान सायबु तडवी, शबाना अफजल तडवी, फिरोज रशिद पिंजारी, लक्ष्मण भिवसन पवार या कुटुंबियांच्या संसाराची राख रांगोळी झाली होती. थोडे-थोेडे पैसे जमा करून संसार उभा केल्यानंतर डोळयासमोर आगीत संसार जळून खाक झाल्याने आगग्रस्त कुटुंबियांचे डोळे पाणावले होते.

अनेक घरांमधील सिलेंडरची चोरी
पार्टींशनच्या घरांना आग लागल्याने एका घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर इतर घरांना आग लागली. यावेळी परिसरातील अनेक घरातील कुटुंबियांनी घरातील सिलेंडर रस्त्यावर आणून ठेवले. दरम्यान आग विझविण्यासाठी अनेक तरुण सरसावले होते. त्याचवेळी रस्त्यावर काढून ठेवलेले सिंलेंडर अज्ञातांनी चोरून नेल्याच्या घटना घडली.

घरातील सामानाची शोध
आगीत जळून खाक झालेल्या घराच्या ठिकाणावरून अनेक बचावलेल्या वस्तु शोधतांना दिसून आले. तसेच घरात काही सामान दुसरीकडे नेत होते. अनेक कुटुंबियांनी घरातील समान हा मंदिरातील मोकळया जागी ठेवला होता. दुसर्‍या दिवशी आगीतील समानातून कुटुंबिय बचावलेला सामान बाहेर काढत होते.

प्रशासनाकडून घटनेचा पंचनामा
दुसर्‍यादिवशी सकाळी तहसिलदार, तलाठी यांच्या पथकाने घटनास्थळी पंचनामा केला. यावेळी आगग्रस्त कुटुंबियांनी लवकारात लवकर प्रशासनाकडून मदत मिळावी अशी मागणी केली.

LEAVE A REPLY

*