कारला लावलेले जॅमर न उघडल्याने वाहतूक विस्कळीत

0

जळगाव । शहरात वाहतूक शाखेकडून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. शहरातील काँग्रेस भवन जवळील रस्त्यावर कारचालक महिलेला आणि वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. शहर वाहतुक शाखेच्या पथकातील कर्मचार्‍यांनी कारचालक महिलेच्या कारला जॅमर लावले. काही वेळानंतर कारचालक मालकाने दंड भरल्यानंतर अर्धातास होवूनही जॅमरचे लॉक न उघडल्याने वाहतुक चांगलीच विस्कळीत झाली होती. यावेळी चॉमरचे लॉक उघडतांना शहर वाहतुक शाखेचे पोलिस कर्मचरी चांगलेच घामाघुम झाले होते. भर रस्त्यावर सुरू असलेल्या या प्रकारामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याने झाल्याने अनेक वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला.

काँग्रेस भवनच्या समोर रस्त्यावर कार क्रमांक एमएच.19.एएक्स.369 लावण्यात आली होती. बेशिस्तपणे पार्कींग केल्याने वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांनी चारचाकीला जॅमर लावले. काहीवेळाने कार मालक महिला गाडीजवळ आली. पोलिसांनी दिलेला दंड त्यांनी भरला. दंड भरल्यानंतर वाहतूक शाखेच्या कर्मचाार्‍यांनी चावीच्या सहाय्याने जॅमर उघडण्यास सुरूवात केली. जवळपास अर्धा तास होवूनही जॅमर उघडले नाही. तीन ते चार प्रकारच्या चाव्या लावल्यानंतरही जॅमर उघडत नसल्याने दोन्ही पोलीस कर्मचारी चांगलेच घामाघूम झाले.कार रस्त्यावर उभी होती त्यातच पोलीस कर्मचारी देखील रस्त्यावर बसून जॅमर उघडण्याचा प्रयत्न करीत होते. बघ्यांची गर्दी झाल्याने टॉवरकडून येणारी वाहतूक विस्कळीत झाली.

अर्ध्या तासाने उघडले जॅमर
जॅमर उघडत नसल्याची माहिती वाहतूक कर्मचार्‍यांनी शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयाला दिली. वाहतूक शाखेचे कर्मचारी विनोद पाटील हे आल्यानंतर त्यांनी जॅमर उघडले. त्यानंतर कारचालक महिलेने कार काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

LEAVE A REPLY

*