मनपाच्या विरोधीपक्षनेतेपदी डॉ.सुनील महाजन

0

जळगाव । महिन्यापूर्वी महापालिकेची निवडणूक झाली. यामध्ये भाजपाने बहुमत सिद्ध केले आहे. दरम्यान आज शिवसेनेची गटनोंदणी करण्यात आली असून विरोधीपक्ष नेते म्हणून डॉ. सुनिल महाजन यांची तर गटनेते म्हणून अनंत जोशी यांची निवड करण्यात आली.

जळगाव महापालिकेची 19 प्रभांगांमधील 75 जागांसाठी दि. 1 ऑगस्ट रोजी निवडणुक झाली. या निवडणुकीत भाजपाचे 57, शिवसेनेचे 11 तर एमआयएमचे 3 उमेदवार निवडणून आले. महापलिकेत भाजपाची सत्ता आली असून शिवसेना ही विरोधीपक्षाची भुमिका पार पाडणार आहे.

दरम्यान आज नाशिक येथे विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्याकडे आ. चंद्रकांत सोनवणे, शिवसेना शहर प्रमुख शरद तायडे यांच्या उपस्थितीत गटनोंदणी करण्यात आली. यामध्ये विरोधीपक्षनेता म्हणून डॉ. सुनिल महाजन यांची तर गटनेतेपदी अनंत जोशी तर उपगटनेतेपदी ईब्राहीम पटेल यांची निवड करण्यात आली. यावेळी याप्रसंगी माजी महापौर नितीन लढ्ढा, नगरसेवक विष्णू भंगाळे, राखीताई सोनवणे, नगरसेवक नितीन बरडे, प्रशांत नाईक, गणेश सोनवणे, नगरसेविका जिजाबाई भापसे, लताताई सोनवणे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*