गांधी मार्केटमध्ये थर्माकॉल विक्रेत्यावर कारवाई

0

जळगाव । राज्यात प्लास्टिकसह थर्माकॉल विक्रीवर देखील बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील शहरात थर्माकॉल विक्री होत असल्याने आज महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील दुकानांची तपासणी करण्यात आली. यामध्ये गांधी मार्केटमधील रेखा आटर्र्स या दुकानामध्ये कारवाई करण्यात आली असून त्याच्याकडून सुमारे एक घंटागाडी थर्माकॉल जप्त करण्यात आला. तसेच त्याला 5 हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे.

राज्यभरात प्लास्टीक तसेच थर्माकॉल बंदी करण्यात आली आहे. मात्र गणेशोत्सावात गणराच्या स्थापना करण्यासाठी थर्माकॉलचा वापर करुन आरास तयार करण्यात येत असते. दरम्यान थर्माकॉलवर बंदी असतांना देखील शहरातील दुकानदारांकडून थर्माकॉलची विक्री केली जात असल्याची माहिती महापलिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाला मिळाली. यावेळी आरोग्यधिकारी उदय पाटील यांच्यासह आरोग्य अधिक्षक एस. बी. बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद सोनवाल, पी. पवार, डी. डी. गोडाले, डॉ. कांबडे, श्री. लोखंडे,

एस. डाबोरे, विनोद पवार, बी. डी. ढंढोरे यांचे पथक तयार करण्यात आले. पथकाकडून आज सकाळपासून शहरातील गांधी मार्केटमधील दुकानांची पाहणी करण्यात आली. या पाहणीत मार्केटमधील रेखा आर्ट्स या दुकानात थर्माकॉल विक्री होत असल्याचे पथकाला दिसून आले. यावेळी आरोग्य विभागाच्या पथकाने थर्माकॉल विक्री करणार्‍या दुकाना धाड टाकून त्या दुकानातून एक घंटागाडी इतके थर्माकॉल जप्त केले असून दुकान मालक प्रकाश शिंपी यांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. थर्माकॉल विक्रेत्यावर अचानक झालेल्या कारवाईमुळे शहरातील मखर विक्रेत्यांसह दुकानदारांमध्ये घबराहट निर्माण झाली आहे.

बाजारपेठेत कॅरीबॅग विक्रेत्यांवर कारवाई
50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅगला बंदी असून देखील भाजीपाला विक्रेत्यांकडून सर्रासपणे कॅरीबॅगचा वापर केला जात आहे. दरम्यान आज आरोग्य विभागाकडून बाजारपेठेची पाहणी करण्यात आली. यामध्ये भाजीपाला विक्रेत्यांकडे कॅरीबॅग आढळून आल्या आहेत. त्यांच्याकडून कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या.

LEAVE A REPLY

*