Type to search

maharashtra आवर्जून वाचाच गणेशोत्सव जळगाव

21 तासांच्या अथक परिश्रमानंतर श्रीगणपती म्युरलची निर्मिती पूर्ण

Share
जळगाव । खान्देश एज्युकेशन सोसायटीमध्ये सुरु असलेला एक लाख एक लिटरच्या रंग भरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा श्री गणपती म्युरल निर्मिती उपक्रम 20 तास 50 मिनीटांच्या अथक परिश्रमानंतर सकाळी 9 वाजून 25 मिनिटांनी पूर्ण झाला. त्याचबरोबर या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉडर्स व एशिया बुक ऑफ रेकॉडर्स या दोन्ही संस्थांमध्ये नोंद देखील झाली. यामुळे केसीई सोसायटीचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले आहे.

आनंदयात्री डॉ.जी.डी.बेंडाळे यांच्या जन्मशताब्दी समारोपाच्या प्रकट कार्यक्रमाप्रित्यर्थ व खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वाटचालीच्या निमित्ताने आयोजित भव्य श्रीगणपती म्युरल निर्मिती दि. 11 व 12 रोजी एकलव्य क्रीडा संकुलाच्या मैदानावर पार पडला. दि. 11 रोजी दुपारी 12.30 वाजेपासून निर्मितीला प्रारंभ होवून दि. 12 रोजी सकाळी 9 वाजून 25 मिनिटांनी समाप्त झाला. एकूण 20 तास 55 मिनिटांत निर्मिती पूर्ण झाली. याकरिता ओजस्विनी कला महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश काटे,

शिक्षक पुरुषोत्तम घाटोळ, प्राजक्ता तायडे यांचेसह 50 विद्यार्थ्यांनी म्युरल पूर्ण केले. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स या दोन्ही संस्थांचे प्रतिनिधी डॉ.ममता काबरा श्री गणपती म्युरल निर्मितीवेळी उपस्थित होत्या. या श्री गणपती म्युरलची निर्मिती पूर्ण केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, संस्थेचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर यांनी म्युरल निर्मिती टीमचे कौतुक केले. केसीई सोसायटीच्या शिरपेचात या विक्रमामुळे मानाचा तुरा रोवला गेला असे ते म्हणाले.

यावेळी टीमने ढोलताशांच्या गजरात जल्लोष केला. दुपारी 4 वाजता इंडिया बुक ऑफ रेकॉडर्स व एशिया बुक ऑफ रेकॉडर्स या दोन्ही संस्थांचे प्रतिनिधी डॉ.ममता काबरा यांनी विक्रमाची नोंद झाल्याबद्दलचे पदक व प्रमाणपत्र संस्थेस प्रदान केले. यावेळी संस्थेतर्फे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर यांनी पदक व प्रमाणपत्र स्वीकारले. यावेळी मुख्य व्यवस्थापन समितीचे सचिव संजीव पाटील यांचेसह डॉ.जगदीप बोरसे, अ‍ॅड. राहुल राणे, सुभाष तळेले, डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!