जळगावात गणरायाच्या स्वागतासाठी सजली बाजारपेठ

0

जळगाव । गणरायाचे उद्या सर्वत्र मोठ्या जल्लोषात आगमन होणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागतासाठी सर्व भक्त आतुरतेने वाट बघत असून गणराच्या मुर्तीसह सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी शहरातील बाजारपेठ गर्दीने फुल्ल झाल्या होत्या.

गणेशोत्सव उद्यावर येवून ठेपला असून घरोघरी लाडक्या बाप्पाची स्थापना केली जाणार असून बाप्पाच्या घरात सजावट करण्यासाठी लगबग सुरु झाली आहे. शहरातील फुले मार्केटसह आकाशवाणी चौक, अजिंठा चौफुलींवर गणेशमुर्ती विक्रेत्यांनी गेल्या काही दिवसांपासून दुकाने थाटली आहे. गणेशमुर्तींची खरेदी तसेच सजावटीसाठी लाईटिंग, मखर यांसह रंगेबीरंगी प्लास्टीकच्या फुलांची खरेदी करण्यासाठी नागरिकांची सकाळपासून लगबग सुरु झाली होती. दरम्यान सायंकाळनंतर गणेशमुर्ती खरेदी करण्याठी रात्री उशीरापर्यंत नागरिकांनी बाजारपेठ गजबजून गेली होती.

पुजेच्या साहित्य विक्रेत्यांनी थाटली दुकाने
गणरायाची स्थापना करण्यासाठी मद्रा, जाणव यासह हळकुंड यासह विविध प्रकारची पुजा आवश्यक असते. पुजेचे साहित्य विक्रीसाठी विक्रेत्यांनी बाजारपेठेत दुकाने थाटली असून ग्राहकांची खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

मोत्यांच्या माळांना अधिक मागणी
राज्य शासनाने प्लास्टीवर बंदी घातली असल्याने यंदा बाजारपेठेत प्लास्टीकचे हार अगदी कमी प्रमाणात विक्रीसाठी आले आहे. तसेच नागरिकांनी देखील यंदा प्लास्टीकच्या हारांऐवजी त्यांच्याकडून मोत्यांच्या माळ्यांची विक्री केली जात असल्याने ग्राहकांकडून त्याची मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे.

कलाकूसरीचे काम केलेले मखर वेधताय लक्ष
आपल्या लाडक्या बाप्पाची स्थापना करण्यासाठी भाविकांकडून विविध प्रकारचे मखर खरेदी केले जात असते. यंदा थर्माकॉलवर बंदी असल्याने बाजारपेठेत लाकडी व पुठ्ठ्यांपासून बनविलेले मखर विक्रीसाठी आले असून कलाकुसर करण्यात आलेले मखर लक्ष वेधून घेत आहे. तसेच नागरिकांनी देखील यंदा थर्माकॉल ऐवजी लाकडी व पुठ्ठ्यांपासून तयार करण्यात आलेल्या मखरची खरेदी केली जात आहे.

रंगेबीरंगी लाईटिंगची झगमगाट
सजावट केलेल्या आरासवर लावण्यासाठी ग्राहकांकडून कॅप्सूलसर मोठ्या आकाराच्या बल्बच्या लाईटींग मागणी होत असल्याने बाजारात विविध प्रकारच्या रंगेबिरंगी एलईडी लाईटींगस् विक्रीसाठी आल्या असून ग्रहाकांकडून यांना मोठ्या प्रमाणात विक्री केली जात असल्याची माहिती शहरातील लाईटींग विक्रेत्यांनी दिली.

सजावटीचे कामपूर्ण
शहरात उभारण्यात आलेल्या मंडळांच्या आरास साकारण्याचे काम पूर्ण झालेे आहे. केवळ मंडळाची आतील भागाची सजावट करण्याचे काम सुरु झाले असून ते अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान गणेश स्थापनेच्या दुसर्‍या दिवसापासून शहरातील मंडळांकडून आरास पाहण्यासाठी खुली करण्यात येणार असल्याचे मंडळांनी नियोजन केले आहे.

मूर्ती घेवून जाण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग
शहरातील गणेश मंडळांनी गेल्या काही दिवसांपासून मुर्ती बुकींग केली होती. गणपती बाप्पाची मुर्ती घेवून जाण्यासाठी आज सकाळपासून शहरातील मुर्ती कारागीरांच्या कारखाने तसेच अजिंठाचौफुलीसह आकाशवाणी चौकात कार्यकर्त्यांकडून बुकींग केलेली मुर्ती घेवून जाण्याची लगबग दिसून येत होती.

ढोलपथक देखील सज्ज
गणरायाचे आगमन ढोलताशाच्या गजरात करण्यासाठी गणेश मंडळांकडून कार्यकर्त्यांचे ढोल-ताशा पथक तयार करण्यात आले आहे. या पथकांकडून गेल्या पंधरवाडयापासून सराव केला जात असून ते देखील गणरायाचे आगमन करण्यासाठी सज्ज झाले आहे. तसेच शहरातील ढोलताशा पार्टी देखील सज्ज झाले असून कार्यकर्त्यांकडून गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी ढोलताशापार्टींची बुकींग केली जात आहे.

LEAVE A REPLY

*