लाखो रुपयांचा ‘चुना’ लावून भिशीचालकाचा पोबारा

0

अमळनेर । दरमहा 4 ते 5 हजार रूपये घेवून भिसी च्या नावाखाली अवैध लकी ड्रॉ चालविणार्‍या सोनूने शेकडो लोकांना लाखो रूपयांचा चूना लावून शहरातून पोबारा केला आहे. या भिसीच्या व्यवहारात त्याने 4 ते 5 कोटी रूपयांचा आर्थीक गफला केल्याचे समजते तो चालवित असलेल्या अवैध लकी ड्रॉ व लीलावाच्या भिशीत अनेक व्यापारी व लहान मोठ्या व्यवसाईकांचे 25 हजारापासून ते 25 लाखापर्यंत रक्कम असल्याचे सांगण्यात आले.

गेल्या 1 वर्षात असा प्रकार दूसर्‍यांदा घडला आहे. महिलांना पैसे बचतीचे महत्व कळावे त्यासाठी काहि वर्षापूर्वी सूरू झालेल्या भिसी या प्रकाराला सद्या शहरात मोठ्या प्रमाणात व्यापक स्वरूप मिळाले असून काहिंनी त्याला रोजीरोटीचे साधन करून छूप्या स्वरूपात सावकारीच सूरू केली आहे या व्यवसायात शहरातील काहिंनी यापूर्वी लाखोची माया गोळा करून पोबारा केला आहे तर नूकतेच एकाने 250 सभासद गोळा करून त्याचे दोन चार ड्रॉ काढून हातवर केल्याने अनेकांची फसवणूक झाली आहे

या बाबत आर्थीक फसवणूक झालेल्या एका व्यापार्‍याने सांगीतले कि शहरातील लालबाग शॉपींग सेंटर मधील माधव ट्रेडर्स च्या नावाने नाममात्र व्यवसाय करणारा मात्र दररोज वेगवेगळी भिसी चालविणारा सोनू बठेजा याने दरमहा 4 हजार रूपये 25महिने भरायचे दरमहा मेंबरचे नाव काढायचे त्याला लाख रूपये द्यायचे पूढे त्याने काहीही पैसे द्यायचे नाही असे 250मेंबरची लकी ड्रॉ भिसी चालवायची या प्रलोभनाला बळी पडलेल्या 250जणांपैकी 25जणांना लाभ झाला मात्र 225जणांना शेवटी रक्कमच मिळाली नाही दरमहा 10लाख रूपये सोनू कडे जमायचे या रक्कमेतून मौजमस्ती व ईतर प्रकार सूरू होते परवा त्याने अत्यंत नियोजनबध्द आपल्या कूटूंबासह रात्रीतून सामान भरून पोबारा केला दोन महिन्यापूर्वीच त्याने ते दूकानही 41लाखात विकून व्यवहार केला होता अनेक जण आता त्याचे मागावर आहेत या प्रकाराला वेळीच आळा घालाण्याची गरज होती

मात्र अमीषाला बळी गेले आज शहरात अनेकांनी भिसी चा व्यवसाय मांडला आहे यात अनेक मोठे व्यापारींसह लहान लघूऊद्योग करणार्‍यांचाही समावेश आहे महिन्याकाठी लहान मोठ्या भिसीच्या माध्यमातून सूमारे 1कोटीचे आसपास व्यवहार होत आहे मूळात भिसी हा प्रकार पूर्वी गल्लीत महिला एकत्र येवून गूपचूपचे पैसे यात गूंतवून एकठोक रक्कम कॉईन किंवा चिठ्ठीच्या माध्यमातून महिन्यातून एक किंवा दोन वेळा हा ड्रॉ काढून ज्याचे नाव निघेल त्याला रक्कम दिली जात होती यात कोणाचे काही फायदा किंवा नूकसान नव्हता मात्र गेल्या काहि वर्षा पासून भिसी या प्रकाराला व्यापाराचे स्वरूप मिळाले आहे अर्थात लहान मोठा व्यवसाय करणार्‍यांना भिसी फायदेशिर ठरते बँकांकडून लवकर कर्ज मिळत नाही को ऑफ पतसंस्था बूडाल्यामूळे नँशनलाईज बँंकाकडून फिरवाफिरव केली जाते मल्टीस्टेट पतसंस्थांचे कर्ज परवडत नाही म्हणून भिसी याप्रकारात स्वतःचेच पैसे आठवडा 15दिवस 1महिना असा येणारा हप्ता त्यांना परवडतो भिसीचा हा पैसा 1ते2 टक्याने पडतो मात्र तो सहज उपलब्ध होतो

यात कॉईनची किंवा लिलावाची भिसी चालविणारा मात्र फायद्यात राहात असल्याने याचे स्वरूप वाढले आहे याचा काहिंनी चांगलाच फायदा घेतला असून काही महाभागांनी अनधिकृत लकी ड्रॉ सारखा व्यवसाय सूरू केला त्यात चार चाकी वाहन मोटर सायकल सोने चांदीचे नाणे वैगेरेचे आमिष देवून एकदा पैसे भरलेवर त्याचा नंबर लागला कि पहिल्या चारपाच सभासदांना प्रोत्साहित करण्यासाठी बक्षीस द्यायचे त्याला बक्षीस लागले नंतर पैसे भरायची गरज नाही शेवटच्या सभासदांना वस्तूंचे वाटप करण्याचे आमिष देवून लकी ड्रॉ सारखा अनधिकृत व्यवसाय करून त्याला भिसी हे गोंडस नाव देवून काहींनी यात स्वतःचा फायदा करून घेतला तर काही नूकसानीमूळे त्यांना तोंड लपवून गाव सोडण्याची वेळ आल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत यात मोजक्याच लोकांचा फायदा होवून अनेकांना मात्र नूकसान सहन करावे लागत आहे

हा प्रकार कुठल्याही गून्ह्यात मोडत नाही व्यापार वाढीसाठी चलन वलनाला लागणारी एकठोक रक्कम मिळत असल्याने आर्थिक चणचण भासत नाही अनेक व्यापार्‍यांकडे सूरू असलेली हि भिसी बाबत कोणाच्या तक्रारी किंवा बोंब नाही मात्र काहिंनी हा प्रकार लकी ड्रॉ सारखा सूरू केल्याने अनेकांची त्यात फसवणूक होत आहे याला वेळीच आळा बसण्याची गरज असून फसवणूक झालेल्यां पैकी कोणी पूढे येवून कायदेशीर लढा दिल्यास वचक बसू शकतो, अशी चर्चा आता जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

*