जळगावात अग्नितांडव

0

जळगाव । शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पंचशील नगर व फुकटपुरा झोपडपट्टी परिसरात शॉर्टसर्किटमुळे पार्टीशनच्या घरांना आग लागली. या भीषण आगीत सुदैवाने जिवीतहानी झाली नसली तरी तब्बल 20 घरांची राखरांगोळी झाली. आगीमुळे नागरिक भयभीत होवून जीवाच्या आकांताने पळत होते. दरम्यान अग्निशमनच्या चार बंबामुळे आग आटोक्यात आली. आगीची घटना सायंकाळी 7.15 वाजेच्या सुमारास घडली.

शहरातील पंचशील नगर व फुकटपुरा झोपडपट्टी परिसर संमिश्र वस्तीचा भाग आहे. या परिसरातील गौतम सोनू सुरवाडे हे पत्नी उज्वलबाई सुरवाडे यांच्यासह आपल्या मुलांबसोबत वास्तव्यास आहे. आज सायंकाळी उज्वलाबाई सुरवाडे या घराबाहेर अंगणात बसलेल्या असतांनाच त्यांच्या घराच्या मागच्या बाजूने धूर निघत असल्याचे शेजारी राहणार्‍या महिलने उज्वलाबाई यांना सांगितले.

दरम्यान घरात कोणीच नसून मुल देखील बाहेर खेळत असून घरातून कसाकाय धूर निघत आहे. हे बघण्यासाठी उज्वलाबाई या घरात गेल्या असता. त्यांच्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या बाजूने पार्टीशनच्या घराने आतून पेट घेतला होता. बघता बघता आगीने रौद्र रुप धारण केले. त्यामुळे परिसरातील पार्टीशनच्या घरांना आग लागत गेली. या आगीत एका घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्याने परिसर हादरुन गेला होता. या भीषण आगीमुळे 20 घरे जळून खाक झाली.

संपूर्ण परिसरात काळोख
झोपडपट्टीला आग लागताच घरांवरुन गेलेल्या वीजवाहीन्या आगीमुळे तुटून गेल्या होत्या. त्यामुळे पंचशील नगरासह फुकटपूरा, ईच्छादेवी मंदिराच्या परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाल्याने संपूर्ण परिसरात काळोख पसरलेला होता.

20 घरे आगीच्या भक्ष्यस्थानी
पंचशील नगर व फुकटपुरा हा भाग संमिश्र वस्तीचा आहे. याठिकाणी राहणारे कुटूंब मोलमजूरी करुन आपला उदनिर्वाह करीत असतात. आपल्या डोळ्यांसमोर घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याचे पाहून रहिवासांना आश्रू आवरणे कठीण झाले होते. या भीषण आगीत सुमारे 20 कुटूंबांची राखरांगोळी झाली.

पोलिसांकडून मदतकार्य
आग लागल्याची समजात एमआयडीसी पोलिस स्टेशनचे कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आग लागलेल्या घरांशेजारील असलेल्या परिसर संपूर्ण रिकामा करीत आग विझविण्यासाठी प्रयत्न करीत होते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक दत्ता शिंदे, अप्पर पोलिस अधिकक्षक लोहीत मतानी, डिवायएसपी सचिन सांगळे यांनी घटनास्थळी भेट देवून घटनेची माहिती जाणून घेतली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनिल कुराडे यांच्यासह, एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक आढाव व दंगानियंत्रण पथक घटनास्थळी दाखल होवून मदत कार्य करीत होते. तसेच महामार्गावर आग बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने महार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांच्यासह कर्मचार्‍यांकडून वाहतुक सुरळीत करण्यात आली.

नगरसेवकांसह समाजिक कार्यकर्त्यांनी दिली भेट
आगीची माहिती मिळताच त्या प्रभागचे नगरसेवक डॉ. सुनिल महाजन, प्रशांत नाईक, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, ईबा पटेल, राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, मनोज सुरवाडे यांनी घटनास्थळी भेट देत माहिती जाणून घेतली. यावेळी रहिवाशांकडून प्रचंड आक्रोश केला जात होता.

मला माझं घर बघू द्या!
झोपडपट्टीतील रहिवासी हे मोलमजूरी आपला उदनिर्वाह करतात. त्यांनी पै पै गोळा करुन घरात टिव्ही, कुलर यासह जीवनावश्यक वस्तू खरेदी केल्या होत्या. दरम्यान आपल्या डोळ्यासमोर आपल घर जळत असल्याचे पाहून त्याठिकणावरील एका जणाने मला माझ घर बघू द्या अशी विनवनी करीत आगीत जाण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु त्याला इसमाला परिसरातील नागरिकांकडून अडविण्यात आले.

रहिवाशांकडून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
फुकटपूरा झोपडपट्टीला आग लागल्याचे समजताच त्या परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी काही तरुणांनी घरांच्या छतावर चढून तर काही जणांनी मिळेल त्या साहित्याने आगीवर पाणी मारुन आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते. तसेच यावेळी महापालिकेचे 3 बंब तर जैन इरिगेशनच्या 1 असे एकून चार बंबानी आग आटोक्यात आणली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत परिसरातील नागरिकांकडुन मदतकार्य सुरु होते.

LEAVE A REPLY

*