एम.जी.रोड मित्र मंडळ साकारणार तुळजापुरच्या भवानी मंदिराची आरास

0

जळगाव । नवी पेठेतील एम.जी. रोड मित्र मंडळ गेल्या आठ वर्षांपासून गणेश भक्तांच्या सेवेत अनेक दर्जेदार व सामाजिक प्रबोधनात्मक आरास सादर करीत आलेले आहे. यंदा शरद भालेराव यांच्या संकल्पनेतून बंगाली कारागिराच्या अविष्काराच्या तुळजापूर येथील भवानी मंदिराची भव्य आरास साकारण्यात येणार आहे. यासाठी तयारी पूर्णत्वाकडे आली आहे.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून शहरवासियांना सांस्कृतिक, सामाजिक, आध्यात्मिक या विषयीचे प्रबोधन घडविण्यासाठी एम.जी. रोड मित्र मंडळाचे दिपक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत विविध देखावे साकारण्यात आले आहेत. या पर्यावरणपूरक देखाव्यांमध्ये पाणी वाचवा, बेटी बचाव, श्री वैष्णो देवी, अमरनाथ धाम दर्शन, श्री संत गजानन महाराज शेगांव, कोल्हापूरची महालक्ष्मी मंदिर अशा भव्य दिव्य देखाव्यांना गणेश भक्तांनी आपली पसंती देऊन प्रोत्साहन दिले. म्हणून यंदा तुळजापूरची आई भवानी या मंदिराचा भव्य देखावा शरद भालेराव यांच्या संकल्पनेतून कन्हैया बारी यांच्या सोबत बंगाली कारागिराच्या अविष्काराच्या माध्यमातून तुळजापूर आई भवानी मंदिर साकारण्यात येणार आहे.

या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार 20 फुट रुंद आणि 35 फुट उंच असे राजेशहाजी महाद्वार असून 30 बाय 40 च्या भव्य शामियानात या मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे. या अशा आकर्षक मंडपात गणरायाच्या मुर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. त्यामुळे जळगावकर भाविकांना याठिकाणी हुबेहुभ तुळजापूर येथील आई भवानी मंदिराचा दर्शनाचा लाभ मिळणार आहे. तरी भाविकांनी दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

यशस्वी नियोजनासाठी कार्यकारिणी निवड
आई तुळजापूर भवानी मुर्ती यंदाचे आकर्षण असून गणेश उत्सव एम.जी. रोड मित्र मंडळातर्फे साजरा करण्यात येणार आहे. यासाठी मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून यात संस्थापक अध्यक्ष ईश्वर पाटील, अध्यक्ष निखील जोशी, उपाध्यक्ष गणेश साळी, सचिव मनोज चौधरी, कोषाध्यक्ष धर्मेंद्र चव्हाण, सहकोषाध्यक्ष प्रशांत काळे, कार्याध्यक्ष निशांत मेहता, सदस्य किरण घुगे, सुभाष चौधरी, जतिन मेहता, धनराज सोनार, राहुल जगताप, पराग सरोदे, राजू वाणी, निखील चौधरी, दलविरसिंग महेंद्रा, मनोज तांबट, खंडू चित्ते, योगेश खैरनार, प्रभुलाल लोहार, सुशांत रडे, बापू चौधरी, किशोर मिस्तरी, ईश्वर सैंदाणे, प्रसाद कापडणे हे कार्यकर्ते गणेशोत्सवासाठी परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

*