चिमुकल्यांनी साकारल्या पर्यावरणपुरक गणेशमूर्ती

0

जळगाव । गणेशोत्सवात पीओपीच्या मुर्त्यांमुळे होणारे प्रदुषण लक्षात घेता मातीच्या मुर्त्यांची स्थापना करण्याच्या दृष्टीने शहरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणेशमुर्ती बनविण्यासंदर्भात कार्यशाळा घेण्यात आली. यात चिमुकल्यांनी आपल्या हातांनी लाडक्या गणरायाची मुर्ती साकारली.

मानवसेवा विद्यालय
मानव सेवा माध्यमिक विद्यालयात गणेशोत्सवाचे औचित्य साधून पर्यावरणपूरक गणेशमुर्ती कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी उपस्थित होत्या. सुनिल दाभाडे यांनी इ.8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना गणेशमुर्ती बनविण्याचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचा विचार करत शाडू मातीपासून गणेश मुर्ती तयार केल्या. तसेच मुर्ती रंगविण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी अलका महाजन, रत्ना चोपडे, अनिता शिरसाठ, गिरीष जाधव यांनी सहकार्य केले. तसेच मानवसेवा प्राथमिक विद्यालयातही कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील, हर्षा चौधरी, मिरा चौधरी, वैशाली साळुंखे, मनोज बावस्कर, योगिता घोलाणे, भारती बुंदे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*