Type to search

maharashtra जळगाव मुख्य बातम्या

मुंबईच्या धर्तीवर जळगावातही गणरायाचा आगमन सोहळा

Share
जळगाव । मुंबईत गणरायाचा आगमन सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा केला जात असतो. मुंबईच्या धर्तीवर यंदा जळगावातही गणरयाचा आगमन सोहळा जल्लोषात पार पडला. यावेळी शहरातील गणेशमंडळांकडून ढोल-ताशाच्या गजरात जल्लोष करीत गणरायाचे स्वागत करण्यात आले.

गणरायाच्या स्थापनेला काही दिवसच शिल्लक राहिलेले असून घरगुती गणपतींसह सार्वजनिक गणेशमंडळांकडून जोरदार तयारी सुरु आहे. मुंबई येथे गणरायाचा आगमन सोहळा मोठ्या थाटात साजरा केला जातो. मुंबईच्या धर्तीवर यावर्षीपासून गणरायाचे आगमन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये बळीरामपेठेतील आझाद

क्रिडा सांस्कृतीक बहुद्देशीय मित्र मंडळ व जोशी पेठेतीली नवरत्न मित्र मंडळातर्फे जोशीपेठचा राजाचा आगमन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी मंडळातर्फे 21 फूट उंच भव्य अशी आकर्षक गणेशाची मुर्तीची स्थापना केली जाणार असून शहरातील कोर्टचौकापासून गणेशाच्या आगमन सोहळ्याला सुरुवात झाली. त्यानंतर नेहरुचौक, टॉवरचौक, घाणेकर चौकामार्गे गणेश मंडळात गणेशाचे जल्लोषात आगमन करण्यात आले.

फटाक्यांची आतषबाजी
गणराच्या आगमन सोहळ्यात मंडळांकडून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. तसेच यावेळी गणरायाच्या मुर्तीवर फुलांचा वर्षाव करीत ठिकठिकाणी गणरायाचे आगमन सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.

ढोलपथाकवर कार्यकर्त्यांनी धरला ठेका!
आगमन सोहळ्याच्या मिरवणुकीत विश्वगर्जना ढोलपथकाकडून ढोल बडविले जात होते. याच्या ढोलपथकाच्या तालावर मंडळांच्या कार्यकर्त्यांनी ठेका धरला होता. यावेळी गणरायाचा आगमन सोहळा बघण्यासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुर्तफा मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

आगमन सोहळ्याचे विशेष आकर्षण
शहरात पहिल्यांदाज मुंबईच्या धर्तीवर गणरायाच्या आगमन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याने जळगावकरांना त्याचे विशेष आकर्षण निर्माण झाले होते. त्यामुळे प्रत्येक भाविक आगमन झालेल्या गणरायाचे दर्शन घेवूनच पुढे मार्गस्थ होत होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!