बंगाल मधील लक्ष्मीच्या मंदिराची भव्य आरास

0
जळगाव । शहरातील नवीपेठ मधील जय गोंविदा मित्र मंडळातर्फे गणेशोत्सवात धार्मीक देवस्थांनावर आधारीत आरास साकारली जात असते. यंदा देखील मंडळातर्फे बंगाल मधील लक्ष्मी देवीच्या मंदिराची भव्य आरास साकारली जात आहे.

नवीपेठ परिसरात गेल्या 25 वर्षांपासून जय गोंविदा मित्र मंडळातर्फे गणेशोत्सव साजरा केला जात आहे. मंडळाचे यंदाचे 26 वे वर्ष असून मंडळास्थापने पासून मंडळातर्फे देशभरातील विविध देवस्थानांची आरास साकारण्यात आली आहे. दरम्यान यावषी मंडळातर्फे बंगाल मधील लक्ष्मी देवीच्या मंदिराची भव्य आरास साकारण्यात येत आहे. यासाठी मंडळातर्फे 25 फुट रुंद तर 70 फूट उंच अशी भव्य मंडप उभारण्यात येत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक शाम कोगटा यांनी दिली.

संपूर्ण विष्णू भगवानांच्या अवतारांचे दर्शन
जय गोंविंदा मित्र मंडळाच्या स्थापनेपासू मंडळातर्फे भगवान विष्णूंनी घेतलेल्या विविध अवतारांची आरास साकारण्यात आली होती. यंदा देखील मंडळाने बंगाल येथील लक्ष्मी देवीच्या मंदिराची प्रतीकृती उभारली जात आहे.

विसर्जन मिरवुणकीचे विशेष आकर्षण
मंडळातर्फे यंदा आठ फुट उंच गणपतीची मुर्ती स्थापन केली जाणार आहे. तसेच विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशा पथक राहणार असून मंडळातर्फे गुलालाची उधळण न करता फुलांच्या पाकळ्यांची उधळण केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

*