जळगावात पोळ्याच्या खरेदीसाठी बाजारपेठ गजबजली

0
जळगाव । शेतात राबणार्‍या सर्जा-राजा विषयी कृतज्ञता व्यक्त करणार सण म्हणजेच बैलपोळा. पोळा हा उद्यावर येवून ठेपला असून पोळ्या
ची खरेदी करण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग सुरु झाली असून बाजारपेठेत गजबजून गेली असलयाची चित्र शहरात दिसून आले.

शेतात राबराब राबणार्‍या सर्जा राजाचा सण असलेला बैल पोळा रविवारी साजरा केला जाणार आहे. या दिवशी बैलाची अंघोळ घालून त्याच्या शिंगांना रंग देवून झुल, नाथ, बोरखी, गोंडे, गेठे यांनी सजवून त्याची मिरवणुक काढली जात असते. दरम्यान बैलपोळा हा उद्यावर येवून ठेपला असल्याने तसेच जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकर्‍यांकडून बैलपोळ्याची जोरदार खरेदी केली जात आहे. तसेच पोळ्यासाठी लागणार्‍या वस्तूंच्या किंमतींमध्ये यंदा 5 ते 10 टक्के भाव वाढ झालेली असल्याची माहिती शहरातील साहित्य विक्रेत्यांनी दिली.

बाजारपेठ गजबजली
जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने ग्रामीण भागातील शेतकरी सुखावला आहे. तसेच शेतकर्‍यांकडून बैलपोळ्याची खरेदी केली जात आहे. तर नागरिकांकडून मातीचे तसेच पीओपीच्या बैलांच्या जोडीचे खरेदी केली जात आहे. यंदा 50 रुपये जोडी पासून ते 200 रुपयांपर्यंत आकर्षक अशी बैलांची जोडी बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहे. या वस्तूंची खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातून शेतकरी सकाळपासून बाजारपेठेत गर्दी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

या वस्तूंना अधिक मागणी
पोळ्याला बैलाची अंघोळ घालून त्याच्या शिंगांना रंग देण्यासाठी बाजारपेठेत विविध प्रकारचे रंग विक्रीसाठी आले आहे. तसेच विविधि प्रकारच्या झुल, घुंगरूमाळ, गोंडे, हार, कवड्यांची माळ, खुटदोर, नाथ, कवडी, मोरखी या वस्तूंना शेतकर्‍यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

*