जळगावात महिलांना कागदी फुले, बुके बनविण्याचे प्रशिक्षण

0
जळगाव । बहुभाषिक ब्राह्मण महिला संघातर्फे समाजातील महिलांसाठी कागदी फुले व बुके बनविण्याच्या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत महिलांना कागदी फुले व बुके बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा व उद्योग मिळावा यासाठी या कार्यशाळेचे आयोजन शहरातील नवसाचा गणपती मंदिरात करण्यात आले होते. दरम्यान सुरुवातीला महिला संघाच्या अध्यक्षा स्वाती कुळकर्णी, अश्विनी पिले, सुधा खटोड यांच्या हस्ते भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

त्यानंतर या कार्यशाळेत अश्विनी पिले यांनी कार्यशाळेला उपस्थित असलेल्या 50 महिलांना सोलाउंड, ओरगंडी, केप्र, स्टॉकिंग याच्यापासून कागदी फुले व बुके बनविण्याचे प्रशिक्षण दिले. कार्यशाळेत महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाती कुळकर्णी यांनी केले. सुत्रसंचलन अमला पाठक यांनी केले. तर आभार छाया त्रिपाठी यांनी मानले. यशस्वितेसाठी स्मिता पिले, शिल्पा नाईक, सुनिता विसपुते, छाया त्रिपाठी, सुधा खटोड, कल्पना खटोड, संध्या कौल, मनिषा दायमा यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*