एमबीए विभागातर्फे सेल्फ मोटिवेशनबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

0
जळगाव । एसएसबीटी अभियांत्रिकीच्या एमबीए विभागातर्फे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता इंडक्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एमबीए प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत तसेच त्यांना महाविद्यालय व एमबीए विभागाने केलेली वाटचाल यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सेल्फ मोटिवेशनबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ. विशाल राणा यांनी मान्यवरांना एमबीए विभागाने मागील काही वर्षात केलेली यशस्वी वाटचाल तसेच एमबीए विभागाने राबविलेले विविध उपक्रम याबाबत माहिती करून दिली. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जैन इरिगेशन लिमिटेडचे पब्लिक रिलेशन ऑफिसर सुबोध सराफ, डॉ. एम. हुसेन व इंडक्शन कार्यक्रमाचे संयोजक व एमबी विभागप्रमुख डॉ. विशाल राणा यांची उपस्थिती होती.

सुरुवातीला प्रमुख पाहुणे सुबोध सराफ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सेल्फ मोटिवेशन याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना सदैव स्वतःची एक आगळीवेगळी ओळख असावी तसेच आपले विचार, कल्पना ह्या सदैव काहीतरी नाविन्यपूर्ण असाव्यात व सदैव आपण आपले व्यक्तिमत्व कसे चांगले राहील.

याबाबत मार्गदर्शन केले.शेवटी त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्याला अगदी जिथून प्रेरणा मिळेल तिथून ती घेण्याचा व एक चांगला नागरिक होण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एमबीए. चे विद्यार्थी आशिष कटियारा तर आभार कल्याणी सुर्वे हिने मानले.

LEAVE A REPLY

*