Type to search

maharashtra जळगाव

पुण्याच्या धर्तीवर गणपती विसर्जन मिरवणूक

Share

जळगाव । पुण्यात मानाच्या गणपतींनंतर इतर सर्व गणपतींचे विसर्जन होत असते. तसेच त्याठिकाणावरील विसर्जन मिरवणुक अत्यंत शिस्तबद्ध असल्याने त्याची संपूर्ण राज्यभरातच चर्चा होत असते. त्यामुळे पुण्याच्या धर्तीवरच जळगावातील गणपतींची विसर्जन मिरवणुक राहणार आहे. तसेच गणपतीच्या दुसर्‍या दिवसापासूनच महापालिकेची सर्व यंत्रणा कार्यान्वयीत राहणार असल्याचे आश्वासन महापलिकेची आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिले.

महानगरपालिका प्रशासनातर्फे सार्वजनिवक गणेशोत्सव महामंडळाची व शहरातील सर्व सामाजिक संस्थांची आढावा बैठक महापालिकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी व्यासपीठावर आयुक्त चंद्रकांत डांगे, महामंडळाचे सचिन नारळे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंह रावळ, महावितरणचे कार्याकारी अभियंता संजय तडवी, मल्टीमिडीयाचे सीईओ सुशिल नवाल, सुभाष मराठे उपस्थित होते. सुरवातीला रोटरी मिड टाऊनतर्फे विसर्जन मिरवणुकीत नागरिकांना मोफत पाणी पाण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी शहरासह जिल्हाभरातून भाविक मोठ्या संख्येने येत असल्याने त्यांच्यासाठी विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर वाहनासाठी मोठी गैरसोय होत असते. त्यामुळे मिरवणुकीच्या मार्गावर पार्कींगची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच मेहरुण तलावावर ज्याठिकाणी मुर्तीचे विसर्जन करण्याची सुविधा केली आहे. त्याच ठिकाणी नागरिकांनी मुर्तीचे विसर्जन करावे. जेणे करुन त्याठिकाणी होणारे अपघात होणार नाही याची काळजी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेण्याचे आवाहन आयुक्तांनी यावेळी केले. त्यानंतर बैठकीला उपस्थित असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी गणेशोत्सावाच्याकाळात येणार्‍या समस्या बैठकीत मांडल्या.

मोकळ्या जागेत होणार मुर्ती विक्रेत्यांचे स्थालांतरण
शहरातील टॉवर चौकापासून ते घाणेकर चौकापर्यंत रस्त्यावर गणेशमुर्ती विक्रेते आपली दुकाने थाटत असतात. त्यामुळे वाहतुकीची मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे या मुर्ती विक्रेत्यांना मनपाच्या सानेगुरुजी रुग्णालयाच्या मोकळ्या जागेत दुकाने थाटण्याची परवानगी देण्याची विनंती शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक एकनाथ पाडळे यांनी केली. यावर आयुक्तांनी टॉवर चौकासह आकाशवाणी चौक व अजिंठा चौफुलीवर विक्रेत्यांना त्याठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत दुकाने थाटण्यासाठी परवानगी दिली जाणार असल्याचे बैठकीत सांगितले.

मिरवणुकीच्या मार्गावर लाईट व्यवस्था करा
गेल्यावर्षी विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर मनपाकडून करण्यात आलेली लाईटची व्यवस्था अत्यंत कमी प्रमाणात होती. त्यामुळे यंदा विसर्जन मार्गावर जास्तीची लाईट व्यवस्था करण्याची मागणी रामानंद पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बी. जी. रोहम यांनी केली. त्यानंतर मार्गावरील लोंबकळलेल्या तारा व उघड्या डिपी दुरुस्त करण्याच्या सुचना उपस्थितांनी बैठकीत मांडल्या. यानंतर महाविरणचे अभियंता कापूरे यांनी प्रत्येक मंडळाने हॅलोजनचा वापर न करता एलईडी लाईचा वापर करण्याचे आवाहन यावेळी गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांना केले. तसेच मिरणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांचे पथक कार्यरत असणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले.

विसर्जनस्थळी असणार दोन स्वयंचलित बोट
गणेशमुर्तीचे विसर्जन करण्यासाठी व तलावातील निर्माल्य संकलीत करण्यासाठी जिल्हा प्रशासन, मनपाच्या दोन स्वयंचलीत बोटींसह पट्टीचे पोहणारे व मनपा कर्मचारी मेहरुण तलावावर राहणार आहे. तसेच मिरवणुकीत विघ्नसंतोषी लोकांवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी ड्रोन कॅमेर्‍याचा वापर करण्याची मागणी यावेळी बैठकीत मांडण्यात आली. यावर देखील दखल घेणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले.

घरोघरी जावून निर्माल्य संकलीत करणार
गणेशोत्सवात गोळा होणारे निर्माल्याचे संकलन करण्यासाठी मल्टीमिडीयातर्फे दररोज घरोघरी जावून निर्माल्य संकलीत केले जाणार आहे. तसेच या उपक्रमासाठी महाविद्यालयीन तरुणांना आवाहन करण्यात येणार असून पहिल्याच दिवसापासून निर्माल्याचे संकलन करण्यासाठी प्रत्येक प्रभागात वाहने फिरवीली जाणार असल्याचे मल्टीमिडीयाचे सीईओ सुशिल नवाल यांनी सांगितले.

…तर पोलिसांचा ताण कमी होईल
मानाच्या गणपती निघाल्यानंतरच विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते. मात्र त्यामागे इतर मंडळे नसल्याने मोठे अंतर तयार होते. परंतु इतर मंडळे एकत्र असल्यानंतरच मानाच्या गणपतीला सुरुवात होईल. तसेच मानाच्या गणपतीनंतरच्या सर्व मंडळांना क्रमांकाचे वाटप केल्यास कोणताही गोंधळ निर्माण होणार नाही. त्यामुळे पोलिस प्रशसानवर येणारा ताण काही प्रमाणात कमी होणार असून त्याचे नियोजन देखील केले णार आहे.

गणेशोत्सावात मनपाकडून सांस्कृतीक कार्यक्रमांची मेजवानी
महापालिकेच्या मानाच्या गणपतीकडून जळगावरांसाठी दि.17 ते 21 रोजी पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये ऑक्रेस्ट्रा, विनोदी नाटक, पारंपारिक वेशभूषा, किर्तन व भजनासह गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच गणेशोत्साच्या काळात अभिनेता सुबोध भावे, विनोदी अभिनेता भरत जाधव यांना देखील आमंत्रीत केले जाणार आहे.

तसेच विसर्जन मिरवणुकीत मुंबई किंवा पुणे येथील पारंपारीक वाद्य वाजविणार्‍या 100 जणांच्या पथकाला बोलविण्यात येणार असल्याने या मिरवणुकीचा जळगावरांना निखळ आनंद घेता यावा जेणे करुन जळगावचा गणेशोत्सव देखील राज्यभरात चर्चेचा विषय ठरावा यासाठी प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!