समाज शिक्षकांमुळेच भारत प्रगत होईल! – प्र-कुलगुरु

0

माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी देशाला समाज शिक्षकांची गरज आहे. समाज शिक्षकांमुळेच भारत प्रगत होईल असे प्रतिपादन प्र-कुलगुरु डॉ. पी. पी. माहुलीकर यांनी केले. शिक्षक दिनानिमित्त आशा फौंडेशन आयोजित कृतज्ञता समाज शिक्षकांप्रती तसेच स्व.पी.आर. पाटील आदर्श शिक्षक व स्व. लताताई पाटणकर आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते.

व्यासपीठावर डॉ. दीपक पाटील व अध्यक्ष डायटचे प्राचार्य नीलकंठ गायकवाड होते. संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मातृभाषा विषयावरील निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. वीरेंद्रकुमार कावडीया (सीए), डॉ. सुभाष चौधरी (वैद्यकीय व्यवसाय), शितल पंड्या (एरोबिक्स), अनिल अत्रे (ग्रंथालय) सुरेश पांडे (सॉफ्ट स्किल), चंद्रशेखर ठुसे (आर्किटेक्ट) व अंजना दोषी (शार्प) इ.चा सन्मान समाज शिक्षक म्हणून तर प्रभाकर पाटील यांचा स्व. पी. आर. पाटील आदर्श शिक्षक तर डॉ. पुष्पा गावित यांचा स्व. लताताई पाटणकर आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव करण्यात आला. सुरेश पांडे, प्रभाकर पाटील, डॉ. पुष्पा गावित व डॉ. दीपक पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास प्रा. चारुदत्त गोखले, शरद डोंगरे, अनिल, सविता भोळे. सुनील याज्ञीक, प्रमोद माळी, ऍड. प्रवीण जंगले, प्रदीप रस्से, श्रीराम मंदिर संस्थानचे श्रीराम जोशी, खेमराज खडके उपस्थित होते. सूत्रसंचालन सुजाता बोरकर यांनी तर आभार प्रदीप पवार यांनी मानले.

LEAVE A REPLY

*