Type to search

maharashtra जळगाव

विद्यार्थ्यांनी व्यक्त केली शिक्षकांप्रती कृतज्ञता

Share

जळगाव । शहरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आज अध्यापनाचे कार्य करुन आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

उज्ज्वल्स् स्प्राऊटर
उज्वल्स स्प्राऊटर स्कुलमध्ये शिक्षक दिनानिमीत्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेतील शिक्षकांनी आपली जबाबदारी ही विद्यार्थ्यांवर सोपवली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांनी एक दिवस शिक्षकांचे काम करुन सोपविण्यात आलेली जबाबदारी व्यस्थित पार पडली. इयत्ता दहावीतील विद्यार्थी याने मुयाध्यापक देवश्री खैरनार, उपख्याध्यापिका वैष्णवी शाह यांनी शाळेचा कारभार सांभाळला. शिक्षक दिवसाचे महत्व प्रणिता कुलकर्णी यांनी सांगितले यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अनघा गगडाणी, मुख्याध्यापिका मानसी भदादे, उपमुख्याध्यापिका साक्षी ओखदे यांच्यासहस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मु. जे. महाविद्यालय
मू.जे.महाविद्यालयात जनसंज्ञापन व वृत्तविद्या विभागातर्फे शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिका साकारत विविध विषयांवर विद्यार्थी व शिक्षकांच्या तासिका घेतल्या. यात सावन वळवी-संवाद व संवादाचे प्रकार, गजानन खर्डे-बातमी लेखन, संदीप माळी-जाहिरात लेखन, मनोज बिर्हारी-जनसंवाद, हमीद बारेला-प्रदूषण व प्रदूषणाचे प्रकार, सागर सोनवणे-पर्यावरणाचे महत्व, प्रियांका अहिरे-पत्रकारितीचे कर्तव्य या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर तासिका घेतल्या. यावेळी विभाग प्रमुख प्रा.विश्वजीत चौधरी,प्रा.प्रशांत सोनवणे, केतकी सोनार यांच्यासह प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते.

प.वि.पाटील विद्यालयात
के.सी.ई. सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षक दिनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये इयत्ता 4 थी च्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत विविध वर्गात अध्यापन केले. मुख्याध्यापिका म्हणून प्राजक्ता कोल्हे या विद्यार्थीनी व मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या हस्ते डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणिती पाटील, साक्षी इंगळे, आदिती सावंदे यांनी केले. तर आभार रितेश देवरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी उपशिक्षिका कल्पना तायडे, सरला पाटील, दिपाली पाटील, योगेश भालेराव यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

भा.का.लाठी विद्यामंदिर
ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित भाऊसाहेब काशिनाथ लाठी विद्यामंदिरात भारताचे दुसरे माजी राष्ट्रपती स्व.डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिव म्हणजे शिक्षकदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पा.शि.संघाचे उपाध्यक्ष संदीप बागुल उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पा.शि.संघाचे अध्यक्ष गजमल नाईक होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमृता वाणी हिने केले. अनुष्का विसपुते, शिवम पाटील, तनुश्री दहाढ, धनश्री खडके यांनी गुरुस्तवन सादर केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या शुभहस्ते डॉ.राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. रविंद्र पाटील यांनी डॉ.राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याचा परिचय करुन दिला. सुत्रसंचलन अर्चित पाटील याने तर आभार खुशी बागुल केले.

आदर्श विद्यालय,कनिष्ठ महाविद्यालय
आदर्श विद्यालय कानळदा येथे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक के.पी.चव्हाण, उपमुख्या. के.एम.विसावे, एन.एच.बाविस्कर यांच्या उपस्थितीत डॉ.राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व्ही.जे.पवार यांनी प्रास्ताविकात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे बालपण, शिक्षकी पेशा व राजकीय कार्याचा परिचय करुन दिला. कोमल सावळे, प्रांजली सोनवणे, प्रियंका भोई, चेतन भदाणे, योगीराज पाटील, जगदीश न्हावकर, रोहित पाटील यांनी प्रतिनिधीक स्वरुपात शाळा चालवत असतांना येणारे अनुभव, गंमती जंमती आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या.

स्वा.सै.ज.सु.खडके विद्यालय
स्वा.सै.ज.सु.खडके प्रा.विद्यालयात शिक्षकदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुख्याध्यापकापासुन ते शिपाईपर्यंतच्या सर्व भुमिका माता-पालकांनी यशस्वीपणे पार पाडल्यात. त्यात त्यांनी उत्कृष्ट परिपाठ सादर करुन सर्व शिक्षक बंधू-भगिनिंचे स्वागत-सत्कार भेटवस्तू देवून पार पाडला. यात मुख्याध्यापिकेची भुमिका दिपाली कोष्टी यांनी पार पाडली. सविता बारी, श्रद्धा महाजन, सपना सोनवणे, ललिता पाटील, रुपाली राणे, वैशाली बारी, जयश्री शिंदे, संगिता कोळी, कविता निकम, नंदा सोनवणे, पुजा महाजन आदी भगिनींनी आपली कामगिरी उत्कृष्टपणे पार पाडली.

का.उ.कोल्हे विद्यालय
काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयात शिक्षकदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थी शिक्षकांनी अध्यापनाचे काम पाहिले. मुख्याध्यापक म्हणून अंकिता भंगाळे, उपमुख्याध्यापक म्हणून वैभव शिरसाठ पर्यवेक्षक म्हणून तेजस मोटे या सर्वांनी यशस्वीरित्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन कामाचे नियोजन करुन दिले. दुपारच्या सत्रात विद्यार्थी शिक्षक म्हणून आलेले अनुभव कथन करतांना विद्यार्थी शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले व शिक्षक दिनाचे महत्व विषद करुन डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. या सर्वांना मुख्याध्यापिका जे.आर.गोसावी, उपमुख्याध्यापक ए.व्ही.ठोसर, पर्यवेक्षक एच.जी.काळे, एस.डी.खडके, बी.एस.राणे यांचे मार्गदर्शन लाभले. आयोजन बी.बी.देवरे यांनी केले. सुत्रसंचलन विद्या पाटील हिने केले. तर आभार प्राची पाटील हिने मानले.

शेठ बी.एम.जैन प्राथमिक विद्यालय
दि. पूर्व खान्देश हिंदी शिक्षण संस्था जळगाव संचलित प्रेमनगर येथील स्व.शेठ बी.एम.जैन प्राथमिक विद्यालयात मुख्याध्याक भास्कर फुलपगार यांच्या अध्यक्षतेखाली डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली. सर्व प्रथम डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व पुष्पार्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कल्पना चौधरी यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याविषयी माहिती दिली. शिक्षक दिनाचे महत्व सांगितले. सुत्रसंचलन अविनाश पाटील तर आभार भूपेन्द्र अहिरे यांनी मानले. सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

बहिणाबाई प्राथमिक व माध्यमिक विद्यालय
बहिणाबाई ज्ञानविकास संस्था संचलित प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शालेय स्तरावर शिक्षकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बंडू काळे होते. यावेळी बंडु काळे यांनी थोर शिक्षण महर्षी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण केले. विद्यार्थ्यांनी अध्यापन व प्रशासन याचा अनुभव शालेय विद्यार्थ्यांनी घेतला. पल्लवी बडगुजर या विद्यार्थीनीकडे मुख्याध्यापक पदाची जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी.पी.चौधरी यांनी केले. सुत्रसंचलन आर.एस.वाणी यांनी तर आभार सी.बी.पाटील यांनी मानले.

बी.एम.जैन उर्दू प्राथमिक विद्यालय
बी.एम.जैन उर्दू प्राथमिक विद्यालयात शिक्षकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. अमीनोद्दीन शेख यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आला. शाळेतील इ.4 थीच्या सुमारे 50 विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक व उपशिक्षक म्हणून भाग घेतला. सकाळ सत्रात सुफियान सादीक शेख तर दुपार सत्रात अनाबीया जब्बार शेख यांनी मुख्याध्यापक म्हणून शाळेचे काम पाहिले. सुत्रसंचलन व कार्यक्रमाची रुपरेषा सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख उपशिक्षक असलम महेबुब खान यांनी मांडली. तर आभार विद्यार्थी मआज वकार शेख यांनी केले.

बालनिकेतन विद्यामंदिर
प्रगती शिक्षण मंडळ संचलित बालनिकेतन विद्यामंदिर जळगाव शाळेत डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापकक डॉ.रविंद्र माळी उपस्थित होते. यावेळी शाळेतील इ.1ली ते 7 वीच्या काही विद्यार्थ्यांनी शालेय अध्यापन केले. अध्यापन करतांना सर्व विद्यार्थी आनंदित असून त्यांना एका वेगळा अनुभव मिळाला. शिक्षकांच्या भूमिकेत विद्यार्थी व विद्यार्थीनींना शाळा चालविर्‍याचे कामकाज केले. कार्यक्रमप्रसंगी सुरक्षा प्रधान वैष्णवी सोनवणे,

प्रविण नाईक यांनी आपले वक्तृत्व सादर केले तसेच बालवाडी विभागातील विद्यार्थ्यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या वेशभूषा केल्या व वक्तृत्व सादर केले. तसेच शिक्षकदिनाचे महत्व, डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याचा परिचय शिक्षक श्रीकांत पाटील, सुवर्णा सोनार यांनी करुन दिला. शाळेचे मुख्याध्यापक डॉ.रविंद्र माळी यांनी प्रसंगी मार्गदर्शन केले. सुत्रसंचलन संगीता निकम यांनी केले. यशस्वीतेसाठी नरेंद वारके, उज्वला जाधव, वंदना धांडे, रशिदा तडवी, राहुल धनगर, ज्योती सपकाळे, छाया पाटील, रागिनी सुयर्र्वंशी, वृशाली पाटील अदींनी परिश्रम घेतले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!