Type to search

maharashtra जळगाव

चोरीला गेलेली मोटारसायकल शोरुमच्या पार्किंगमध्ये सापडली

Share
जळगाव । तालुक्यातील शिरसोली गावातून जवळपास 4 महिन्यापूर्वी चोरीला गेलेली मोटारसायकल शहरातील अंजिठा चौकात असलेल्या एका मोटारसायकल शोरुमच्या पार्कींगमध्ये बेवारस स्थितीत मिळून आली आहे. गाडी मालकाने याठिकाणी जावून मोटारसायकल ताब्यात घेतली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिरसोली येथिल रहिवाशी असलेले विजय रघुनाथ बारी यांच्या मालकीची मोटारसायसकल क्रमांक एमएच 19 बीए 2549 ही गावातूनच दि. 26 एप्रिल रोजी चोरून नेली होती. चोरटा मोटारसायकल घेऊन जात असल्याचे दिसल्यानंतर बारी यांनी दुसर्‍या एका मोटारसायकलीने त्याचा पाठलाग केला होता. परंतू, चोरटा पळून जाण्यास यशस्वी झाला होता.

याबाबत बारी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता. चार महिन्यांपासून मोटारसायाकल चोरीस गेलेली असल्यामुळे परत मिळेल अशी अपेक्षा बारी यांनी सोडून दिली होती. दरम्यान शिरसोली गावातच राहणारे विजय बारी यांचे मित्र त्यांची मोटारसायकल सर्व्हीसींग करणयासाठी अजिंठा चौफुली येथील एका शोरुममध्ये आले होते. तेथे पार्कींमध्ये बारी यांची मोटारसायकल त्यांना दिसून आली. त्यांनी विजय बारींना फोन करून मोटारसायकलीचा नंबर विचारल्यानंतर ती मोटारसायकल विजय बारी यांची असल्याची खात्री झाली. त्यानंतर बारी यांनी शोरुममध्ये येवून मोटारसायकल ताब्यात घेतली.

व याबाबत माहिती पोलिसांना दिली. दरम्यान, मोटारसायकल शोरुमध्ये दिवसाला सुमारे 150-200 मोटारसायकली सर्व्हीसींगला येत असतात, त्यामुळे बारी यांची मोटारसायकल कधी व कोणी शोरूमला आणून उभी केली याबाबत माहिती मिळणे अशक्य आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!