बाहुबलीच्या भव्य राजवाड्याची आरास

0

जळगाव । गणशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे. शहरातील गणेश मंडळांकडून गणोशोत्सवाची जोरदार तयारी सुरु झाली असून जळगावचा राजा नेहरु चौक मित्र मंडळातर्फे यंदा बाहुबली चित्रपटातील राजवाड्याची आरास साकारण्यात येणार आहे. तसेच गणेशोत्सवात अवयवदान व पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती देखील मंडळाकडून यंदा केली जाणार आहे.

जळगावचा राजा नेहरुचौक मित्र मंडळाचे यंदाचे 31 वे वर्ष आहे. या मंडळाकडून गेल्या तीस वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक यासह धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते. तसेच गेल्या काही वर्षांपासून मंडळांकडून विविध देवस्थान, धार्मीक स्थाळांची आरास साकारण्यात आली आहे. दरम्यान यंदा देखील मंडळाकडून बाहुबली चित्रपटातील राजवाडा साकारण्यात येणार आहे. तसेच राजवाड्या बाहेर दोन मोठे हत्ती देखील ठेवण्यात येणार आहे. यासाठी महानगरपालिकेसमोर 25 फुट रुंद व 70 फुट उंच असे सभामंडप तयार करण्यात येत आहे. जळगावसह पुणे येथील कारागीर गेल्या 12 दिवसांपासून दिवसरात्र मंडळची बांधणी करीत आहे. मंडळाचे उभारणीचे काम पुर्ण झाल्यानंतर हुबेहुब बाहुबली चित्रपटाच्या स्टेजचा अनुभव जळगाववासियांना अनुभवास येईल. असे स्टेजचे निर्माण करणार्‍या कारागिरांनी सांगितले. तसेच या मंडळाची आरास साकरण्यासाठी मंडळाचे महेश ठाकूर, ललित अमोदेकर, पियुष गांधी हे परिश्रम घेत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष अजय गांधी यांनी दिली.

विसर्जन मिरवणुकीत तीन ढोल पथकाचे आकर्षण
गणेश विसर्जन मिरवणुकीत मंडळातर्फे जिल्ह्याबाहेरील तीन ढोल पथक असणार आहे. या ढोलपथकाकडून विविध प्रकारचे वाद्य वाजिविले जाणार असल्याने ढोलपथक हे विसर्जन मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरणार आहे.

पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती करणार
मंडळची आरास बघण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. दरम्यान येणार्‍या भाविकांमध्ये पर्यावरण व अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी मंडळाच्या परिसरात जनजागृती करणारे पोस्टर लावण्यात येणार आहे.

अशी आहे मंडळाची कार्यकारणी
नेहरु चौक मित्र मंडळाचे यंदाचे 31 वे वर्ष असून मंडळाच्या अध्यक्षपदी अजय गांधी, उपाध्यक्षपदी अ‍ॅड. विपीन पाटील, खजिनदार जगदिश जोशी, सचिव निलेश अग्रवाल व मनोज नागला यांची निवड करण्यात आली आहे.

गणेश मुर्ती ठरणार लक्षवेधी
नेहरु चौक मित्र मंडळाची गणेश मुर्ती मुंबई येथील सुप्रसिद्ध मुर्तीकार स्व. विजय खेतू यांची मुलीने तयार केली असून साडेपाच फुट उंच अशी आकर्षक मुर्तीची मंडळाकडून स्थापना केली जाणार असल्याने ही गणेश मुर्तीचे लक्षवेधी ठरणार आहे. तसेच गणेशोत्सवाच्या काळात मंडळातर्फे अथर्वशिर्ष पठण व 21 जोडप्यांच्या हस्ते सत्यनारायणाची महापुजेचे देखील आयोजन करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*