वेल्हाळे मंदिरात यात्रोत्सव

0
वरणगाव ता.भुसावळ । वार्ताहर – तालुक्यातील वेल्हाळे येथे पुरातन काळातील कपिलेश्वर महादेव मंदिर आहे. या हेमाडपंती मंदिराकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याने येथे यात्रा उत्सव होत नव्हता गावातील तरुणांच्या पुढाकाराने सोमवार पासून श्रावण यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

वेल्हाळे येथे अकराव्या शतकातील कपिलेश्वर महादेव मंदिर आहे यादव कालीन हेमांडपंथी या मंदिरात शिवपिंड कदंब पुष्पा कृती आकाराचे असून ते शिवशक्ती यंत्रावर आधारित आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे 21 जून हा मोठा दिवस या दिवशी व नंतर दोन-तीन दिवस सूर्याची किरणं थेट पिंडी वरती पडत असल्याने या मंदिराविषयी नागरिकांची भाविकांची श्रद्धा आहे. या इतिहासकालीन मंदिराकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

या मंदिराची निर्मिती यादव राजाने केल्याचे इतिहासामध्ये नोंद आहे कपिलेश्वर महादेव मंदिर हे संपूर्ण दगडांमध्ये कोरीव बांधकाम केले आहे. त्यात मुख्य गाभारा व त्या आधी एक छोटा सभामंडप आहे. त्यानंतर मुख्य सभामंडप आहे त्यात प्रत्येकी चार स्तंभ आहेत. त्यापैकी काही स्तंभावर देवी-देवतांचे रक्षकांचे कोरीव काम केले आहे. हे अतिप्राचीन आहे यावरून सिद्ध होते.

सन 1978 मध्ये पंढरीनाथ स्वामींनी गावकर्‍यांच्या सहकार्यातून या मंदिराचे उत्खनन करून जीर्णोद्धार केला होता त्यावेळेस पासून या मंदिराविषयी गावोगावी महती पोहोचली आहे. या यात्रा उत्सवानिमित्त स्वामी पंढरीनाथ महाराज, माजी मंत्री एकनाथ खडसे, आ. संजय सावकारे दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता राजेंद्र बावस्कर, वेल्हाळे सरपंच स्मिता पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती असणार आहे

धार्मिकतेला वृक्षारोपणाची जोड- वेल्हाळे हे गाव दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातून निघणार्‍या राखेमुळे बाधित झाले आहे यावरती एकच उपाय म्हणजे वृक्षारोपण या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी वृक्षारोपण करून धार्मिकतेला वृक्षारोपणाची जोड दिली जाणार आहे यातून निसर्गाचे ऋण व्यक्त करणार आहेत

LEAVE A REPLY

*