पारोळा येथे महिला दक्षता समितीची बैठक : अनेक विषयांवर वादळी चर्चा

0
पारोळा । पारोळा पोलीस ठाण्यात आज दुपारी दोन वाजता पोलीस निरीक्षक विलास सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली महिला दक्षता समितीची बैठक घेण्यात आली या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर वादळी चर्चा झाली यात बाजारपेठ ठेलागाडी धारकांचे वाढलेले अतिक्रमण या वर पोलीस प्रशासना कडून कारवाई करण्यात यावी,बाजारपेठेत उघड्यावर मच्छी विक्री केली जाते,

बाजारपेठेत खाद्य पदार्थ उघडे विकले जातात, त्यावर माश्या बसतात या मुळे शहरवाशीयांचे आरोग्य धोक्यात येऊ पाहत आहे .गेल्या 30 वर्षा पूर्वी ज्या ठिकाणी बाजारपेठ आहे ती तशीच आहे. लोकसंख्या दुपटीने वाढली पण बाजारपेठ आहे तिथेच आहे. याचा सर्वाधीक त्रास तो महिला वर्गाला होत आहे. आता तर राजकारण्यांनी शहाणे होऊन ही बाजारपेठ आंग्रे तलावात स्थलांतरित करावी अशी सूचना व मागणी या बैठकीत महिला दक्षता समितीच्या प्रमुख डॉ मंदाकिनी पाटील यांनी केली.

शहरातील बालाजी मंदिरचा ध्वनिक्षेपकाचा आवाज मोठा असतो त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होतो म्हणून मंदिर प्रशासनास आवाज कमी करण्यासाठी सूचना देण्यात यावी असे सांगण्यात आले. श्रीराममंदिर परिसरात अवैध धंदे दारू मोठ्या प्रमाणावर विकली जाते.दारू पिऊन काही दारुडे झिंगत शिवीगाळ करतात त्याचा त्रास महिलांना सहन करावा लागतो .ठेला गाडींवर सोडा बॉटल मध्ये ही दारू विकली जाते पोलीस प्रशासनाने यावर कडक कारवाई करावी अशी मागणी या वेळी करण्यात आली,

तसेच डी. जे.चे ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी डी. जे.वर कायमची बंदी घालण्यात यावी असा ही विषय या बैठकीत घेण्यात आला त्यावर कडक उपाय योजना आखली जाईल असे पो नी विलास सोनवणे यांनी सांगितले तसेच दर महिन्याला दोन दिवस बाजारपेठत पोलीस प्रशासन, नगर पालिका प्रशासन, आणि महिला दक्षता समिती असे पथक फिरून या सर्व गोष्टी ना चाप बसविणार आहेत या बैठकीला महिला दक्षता समितीच्या डॉ मंदाकिनी पाटील ,

विजया बंडू वाणी,संध्या .पी .मुंदाणकर, प्रा.शुभांगी नितीन मोहरीर,सुनंदा शेंडे आदी जण उपस्थित होते या वेळी महिला दक्षता समितीची पुनर्रचना करण्यात येऊन सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड असलेल्या महिला प्राध्यान क्रमाने या समितीत घेण्यात यावे असे सर्वानुमते ठरले. उपस्थित महिला दक्षता समिती सदस्य यांचे आभार पो काँ सुनिल पवार यांनी मानलेत.

LEAVE A REPLY

*