गोदावरी बँक गाठणार 100 कोटींच्या ठेवींचा पल्ला

0
जळगाव । सहकार क्षेत्राची परीस्थीती हालाखिची असतांनाही गोदावरी लक्ष्मी सहकारी बँकेवर सभासदांनी आपला विश्वास कायम ठेवला आहे. या विश्वासाच्या बळावर गोदावरी बँक वर्षभरात 100 कोटींच्या ठेवींचा पल्ला गाठणार असल्याचे प्रतिपादन बँकेचे चेअरमन माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी केले. दरम्यान गोदावरी लक्ष्मी बँकेतर्फे सभासदांना 9.50 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.

गोदावरी लक्ष्मी सहकारी बँकेची 18 वी वार्षिक सर्वसाधारण सभा गोदावरी अभियांत्रिकीच्या प्रांगणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन माजी खा. डॉ. उल्हास पाटील हे होते. तर व्यासपीठावर व्हा. चेअरमन सोनु भंगाळे, संचालक राजेंद्र पाटील, तज्ञ संचालक सीए हेमचंद्र वायकोळे, सीए सुनिल महाले,

सुरेश झोपे, डॉ. संपत वानखेडे, डॉ. चंद्रसिंग पवार, हरीष फालक, सुभाष पाटील, लिलाधर चौधरी, राजेंद्र कुरकुरे, आशा तळेले, संगीता चौधरी, यमुनाबाई महाजन, व्यवस्थापकीय संचालक अशोक महाजन हे उपस्थित होते. सभेच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर वर्षभरात मृत पावलेल्या सभासदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर व्यवस्थापकीय संचालक अशोक महाजन यांनी गोदावरी बँकेच्या प्रगतीचा आढावा सभासदांसमोर मांडला.

अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करतांना चेअरमन डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले की, मधल्या काळात नोटबंदीमुळे अनेक बँकांसमोर प्रश्नचिन्ह उभे राहीले होते. असे असतांना गोदावरी लक्ष्मी सहकारी बँकेने आर्थिक शिस्तीच्या माध्यमातुन नोटबंदीला सक्षमपणे तोंड दिले.

सभासदांचा विश्वास न डळमळु देता कर्जदार, ठेवीदार यांना नेहमीच सहकार्य केले आहे. सभासदांनी गोदावरी बँकेवर जो विश्वास दाखविला त्यामुळे नफ्यामध्ये 28 टक्के, ठेवींमध्ये 13 टक्के आणि कर्जात 16 टक्केंनी वाढ झाली आहे. तसेच 31 मार्च अखेरपर्यंत बँक शुन्य टक्केच्याही कमी एनपीएचे प्रमाण आणेल. गोदावरी बँकेला यंदा 3 कोटी 19 लाखाचा ढोबळ तर 1 कोटी 12 लाखाचा निव्वळ नफा झाला आहे.

बँकेच्या सर्व शाखा ह्या ऑनलाईन झाल्या असुन भुसावळ, सावदा आणि जळगाव येथे आता बँकेची स्वमालकीची वास्तु असल्याचे डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले. तसेच गोदावरी बँकेचे कर्जवाटप 48 कोटी असुन ठेवी 71 कोटींपर्यत पोहोचल्या आहेत. गोदावरी बँक लवकरच 100 कोटींच्या ठेवीचा पल्ला गाठणार असल्याचे डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले. यावेळी सभासदांना 9.50 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.

वार्षिक सभेत 62 सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सभेचे सुत्रसंचालन राजश्री महाजन यांनी तर आभार व्यवस्थापकीय संचालक अशोक महाजन यांनी मानले.

LEAVE A REPLY

*