श्रावण सोमवारनिमित्त ओंकारेश्वर मंदिर आज दिवसभर खुले

0
जळगाव । श्रावण सोमवारनिमित्त शहरातील प्रसिध्द व भाविकांचे श्रध्दास्थान असलेले श्री ओंकारेश्वर मंदिर भाविकांनी दिवसभर खुले राहणार आहे. श्रावण सोमवारनिमित्त शहरातील मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

श्रावण मासातील प्रथम श्रावण सोमवानमित्त मंदिरावर विविध धार्मिकांसह मुंबईहून विशेष आणलेल्या फुलांद्वारे नयनरम्य श्रृंगार करण्यात येणार आहे. सकाळी शिवअभिषेक पुजन व त्यानंतर विशेष रुद्राभिषेक पुजन होणार आहे. त्यानंतर दुपारी 12 वाजता अभिजित मुहुर्तावर जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या हस्ते महाआरती करण्यात येणार आहे. त्यानंतर बंडुलाल बिर्ला यांच्या हस्ते लघुरुद्राभिषेक व शिवरुद्राभिषेक पुजन करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या हस्ते आरती करण्यात येणार आहे. तसेच दिवसभर सत्संग भजन मंडळातर्फे सुश्राव्य शिवभजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सिध्दी व्यंकटेश मंदिरात झुला महोत्सव
श्रावण मासानिमित्त श्री सिध्दलक्ष्मी व्यंकटेश मंदिरातर्फे उद्या दि. 13 रोजी संध्याकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत झुला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त भाविकांना दर्शनासाठी व्यंकटेश देवस्थान दिवसभर खुले राहणार असल्याने जास्तीत जास्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सिध्द व्यंकटेश देवस्थानातर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*