जि.प.निधी नियोजनाचे ग्रहण सुटता सुटेना!

0
जळगाव । जिल्हा परिषदेला डिपीडीसीकडून 120 कोटीचे नियत्वे प्राप्त झाले आहे. सीईओ शिवाजी दिवेकर यांनी तयारी केली आहे. मात्र सभा निश्चीत करण्यावरुन सत्ताधार्‍यांमध्ये झालेल्या वादामुळे कामांचे निंयोजन पुन्हा फिसकटले असून गेल्या दोन महिन्यांपासून निधी नियोजनाला लागलेले ग्रहण सुटता सुटण्याची चिन्हे दिसत नसल्याने हा विषय पुन्हा बारगळा आहे.

गेल्या वर्षी निधी खर्चासाठी जि.पला तारेवरची कसरत करावी लागली होती. सत्ताधारी व विरोधक यांच्या वादामुळे जानेवारी पर्यंत कामांचे नियोजन झाले नाही. हा कटू अनुभव आल्याने यावर्षी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांनी नियोजन खर्चाबाबत पदाधिकारी व अधिकार्‍यांची बैठक घेवून वर्क कॅलेंडरनुसार कामे करण्याबाबत भुमिका मांडली होती. यानुसार विभागनिहाय कामांचा आराखडा देखील तयार करण्यात आला आहे.

मात्र यानंतर दोन सर्वसाधारण सभा घेण्यात आल्या. परंतु यात एका सभेला आचारसंहितेचा खोडा होता. त्यामुळे दुसरी सभा घेण्यात आली. परंतु या सभेतही नियोजन न झाल्यामुळे या सभेचा मुळ हेतूच बारगळ्याने सदस्यांमध्ये तीव्र संताप दिसून आला. यानंतर पुन्हा 23 रोजी सभा बोलविण्यात आली होती. परंतु अध्यक्षांनी हि सभा पुन्हा रद्द केली. त्यामुळे नियोजन करणार तरी कसे असा संतप्त सुर पदाधिकार्‍यांसह सदस्यांमध्ये उमटत आहे.

गतवर्षीदेखील नियोजनाचा घोळ
जिल्हा नियोजन मंडळाकडुन जिल्हा परिषदेला मिळालेल्या निधीचे सत्ताधार्‍यांमधील अंतर्गव वादामुळे नियोजन न झाल्याने निधी परत जाण्याची वेळ आली होती.

अध्यक्षांकडून नियोजनाकडे दुर्लक्ष
डिपीडीसीकडुन आलेली नियत्वे व त्यातुन करवायाची कामे याचे नियोजन मंजूर करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा दि.23 रोजी बोलवली होती. परंतु ही सभा अध्यक्षांनी रद्द केल्याने सत्ताधार्‍यांमध्ये फुट पडल्याचे समोर आले आहे. नियोजनाचा निधी येवून दोन महिने होवून देखील नियोजन झाले नाही.

त्यात गेल्या महिन्यातच अध्यक्षांनी सर्वसाधारण सभा आयोजित केली नाही. पण ज्या प्रयोजनासाठी सभा घेतली त्यात नियोजनाचे विषय ठेवले नाही, अर्थातच सभेचे प्रयोजन साध्य झाले नाही. अध्यक्षांनी विषयच पटलावर ठेवले नाही. त्यामुळे पुन्हा सभा घेण्याची नामुष्की ओढवली असल्याचा आरोपही उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी केला. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्षांमधील दरी अधिकच वाढली असल्याचे या घटनेवरुन दिसून आले.

LEAVE A REPLY

*