शिंपी समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप

0
जळगाव । क्षत्रीय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्थेतर्फे संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ पिंप्राळा रोड येथील यश लॉन येथे आज पार पडला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पुजन आ.राजुमामा भोळे, माजी आ.सुरेशदादा जैन, समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनिल निकुंभ, उपाध्यक्ष मुकूंद मांडगे, नितीन बाविस्कर, कार्याध्यक्ष रविंद्र बागुल, सरकार्यवाह संजय खैरनार, एन.एन. बागुल, शांताराम सावळे, नरेंद्र भामरे, दिलीप भांडारकर, पुरुषोत्तम शिंपी, नरेंद्र कापडणीस, अंजली बाविस्कर, दत्तात्रय कापुरे, पोपटराव शिंपी, परेश जगताप, राजेंद्र बाविस्कर, रामकृष्ण शिंपी यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष सुनिल निकुंभ होते. प्रास्तविक मुकूंद मेटकर यांनी केले. सुत्रसंचालन सुजित जाधव, संजय जगताप यांनी केले. यावेळी गुणवंत विद्यार्थी गौरव शिरसाळे, साक्षी शिरसाळे, प्रतिक्षा जगताप, समृध्दी शिंपी, पुजा देवरे, अश्वीनी चव्हाण, हर्षीता जगताप, यश निकुंभ तर अश्विनी जगताप हिला येरोबिक्स जिमनॉस्टीक खेळात कांस्यपदक मिळविल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात आले.

यानंतर पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विवेक जगताप, मनोज भांडारकर, प्रशांत कापुरे, दिलीप सोनवणे, दिपक जगताप, दिलीप भामरे, राजेंद्र सोनवणे, जगदीश जगताप, मनोज मेटकर, चेतन खैरनार, विकास जगताप, नाना कापडणीस, दिनेश खैरनार, सुरेश सोनवणे, राजेंद्र खैरनार, शरद गांडे, सतिष पवार, निलेश चव्हाण, संदीप जगताप, योगेश सोनवणे यांनी परिश्रम घेतले. संस्थेचे सचिव अनिल खैरनार यांनी मानले.

LEAVE A REPLY

*