माहेश्वरी समाज मेळाव्यात 300 युवक-युवतींचा परिचय

0
जळगाव । शहरातील आदित्य लॉन्स येथे झालेल्या माहेश्वरी समाज परिचय संमेलनात आज 300 पेक्षा अधिक विवाहेच्छुक युवक- युवतींनी परिचय करुन दिला.

जिल्हा माहेश्वरी विवाह सहयोग समितीतर्फे आदित्य लॉन्स येथे आज रजक महोत्सवी संमेलन पार पडले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर नितीन लढ्ढा हे होते.

तर प्रमुख पाहुणे म्हणून मेहकरचे डॉ. सुभाष लोहीया, जीएसटी विभागाचे सहाय्यक आयुक्त मेहूल इंधाणी, संस्थापक अध्यक्ष बाळकृष्ण बेहडे, अध्यक्ष शामसुंदर झंवर, उपाध्यक्ष प्रमोद झंवर, सचिव सुरजमल झंवर, सहसचिव डॉ. जगदिश लढ्ढा, खजिनदार सुभाष जाखेटे, सहखजिनदार विवेकानंद सोनी, प्रकल्प प्रमुख वासुदेव बेहडे हे उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत बी. जे. लाठी व प्रतिभा जाजू यांच्या हस्ते करण्यात आले.

वयात लग्न होणे या विषयावर संजय दहाड यांनी मार्गदर्शन केले. सुरुवातीला सायली झंवर, पुजा सोमाणी, मनिषा झंवर, वैष्णवी झंवर यांनी महेशवंदना सादर केली. या संमेलनासाठी राज्यभरातून 550 युवक-युवतींची नोंदणी करण्यता आली होती. त्यापैकी 300 पेक्षा अधिक युवक युवतींनी विवाहासाठी परिचय करुन दिला.

यावेळी रजत महोत्सवानिमीत्त रंगीत पुस्तकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यशस्वितेसाठी समितीच्या सर्व सभासदांनी व मान्यवरांनी परिश्रम
घेतले.

LEAVE A REPLY

*