विद्याहरी देशपांडे यांच्या कथ्थक नृत्याची रसिकांना भुरळ

0
जळगाव । गोदावरी संगीत महाविद्यालयाच्या 22 व्या वर्धापनदिनानिमीत्त आयोजीत नृत्याविष्कार सोहळ्यात विद्याहरी देशपांडे यांच्या कथ्थक नृत्याची रसिकांना अक्षरश: भुरळच पडली.

गोदावरी संगीत महाविद्यालय व सांस्कृतिक मंत्रालय नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने गोदावरी संगीत महाविद्यालयाचा 22 वा वर्धापन दिन गंधे सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापनदिनानिमीत्त नाशिक येथील प्रख्यात कथक नृत्यांगना विद्याहरी देशपांडे यांचा नृत्याविष्कार सादर करण्यात आला.

याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, संगीत महाविद्यालयाच्या प्राचार्या पद्मजा नेवे आदींसह मान्यवर रसिक मोठ्या संख्येन उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला कृष्ण वंदना सादर करण्यात आली.

त्यानंतर थाट, आमद, पारंपारीक तोडे, परण, गद आदी सादर करण्यात आले. लच्छु महाराज रचित दक्ष यज्ञद्वारा शिवतांडवाची प्रस्तुती त्यांनी केली. भावप्रदर्शनामध्ये महाराज बिंदादिन रचित झुला सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. दूत लयीत राग भैरवी तराना सादर करीत कार्यक्रमाची सांगता झाली. तबल्यावर नितीन पवार, हार्मोनिअमवर प्रशांत महाबख गायनात सुनिल देशपांडे यांची साथसंगत मिळाली. निवेदन महिमा मिश्रा अय्यंगार यांनी केले.

LEAVE A REPLY

*