जिल्हा स्पोर्टस्तर्फे जिल्हास्तरीय एरोबिक्स, फिटनेस स्पर्धेचे आयोजन

0
जळगाव । वि.प्र.- जळगांव जिल्हा स्पोर्टस् एरोबिक्स आणि फिटनेस असोसिएशन तर्फे जिल्हा स्तरीय स्पोर्टस् एरोबिक्स आणि फिटनेस एरोबिक्स स्पर्धेचे आयोजन दि.10 रोजी सकाळी 11.30 वाजता ड्रॅगन्स डान्स एन फिटनेस हॉल, आर.टी.ओ. ऑफीस रोड येथे आयोजित करण्यात आले आहे.

स्पोर्टस् एरोबिक्स खेळ हा सि.बी.एस.ई. बोर्डामध्ये खेळ म्हणून मान्यता प्राप्त असून या स्पर्धेमध्ये यशस्वी होणार्‍या खेळाडूंना राहूरी (अहमदनगर) येथे होणार्‍या 13 व्या राज्यस्तरीय एरोबिक्स आणि फिटनेस स्पर्धा 2018 मध्ये निवड करण्यात येणार असल्याची माहिती एरोबिक्स असोसिएशनचे सचिव बी. आनंदकुमार यांनी ‘देशदूत’ शी बोलतांना दिली.

या स्पर्धा सब ज्युनियर, ज्युनियर, कॅडेट, सिनीयर, मुले, मुली या वयोगटात ठेवण्यात आल्या असून या स्पर्धेत विविध प्रकार असून त्यात स्पोर्टस् एरोबिक्स, फिटनेस एरोबिक्स, एरोबिक्स गृप, हिप-हॉप आदि प्रकार वैयक्तीक, मीक्स पेअर, ट्रायो, फिटनेस टीम, ग्रान्डे, पेटाईट, बॅटल, स्मॉल क्यु, मेघा क्यु आदि प्रकारामध्ये होणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बी.आनंदकुमार भ्रमणध्वनी क्र. 9225588574 वर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*