भारोत्तोलक मिराबाई चानू स्पर्धेतून बाहेर

0
नवी दिल्ली । भारताची विश्व चॅम्पियन वेटलिफ्टर मीराबाई चानू हिनं आशियाई खेळांतून माघार घेतली. पाठदुखीने त्रस्त असलेल्या मीराबाईने इंडियन वेटलिफ्टिंग फेडरेशनला पत्र लिहून आराम देण्यासाठी विनंती केली होती. ऑॅलिम्पिक क्वालिफायरसाठी तिला स्वत:ला तयार करायचे असल्याचेही तिने म्हटले.

इंडियन वेटलिफ्टिंग फेडरेशन (आयडब्ल्यूएलएफ) चे सचिव सहदेव यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. टोकयो ऑलिम्पिक स्पर्धेला पात्र ठरण्याचे लक्ष्य बाळगल्यामुळे या स्पर्धांतून माघार घेण्याचा विचार ती करत असल्याचे सांगितले जात होते. मे महिन्यापासून मीराबाई चानू ही पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे. ती अद्याप यातून सावरलेली नाही. वेटलिफ्टिंग फेडरेशनला याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला आहे. आता तिच्याबाबतचा निर्णय हा फेडरेशनच घेईल, असे प्रशिक्षक विजय शर्मा यांनी काल स्पष्ट केले.

आशियाई खेळांचे आयोजन 18 ऑॅगस्ट ते 2 सप्टेंबरपर्यंत इंडोनेशियाच्या जकार्ता आणि पालेम्बँग शहरात करण्यात आले आहे. भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानू या खेळांत सुवर्ण पदकाची प्रबळ दावेदार होती. जकार्तामध्ये होणार्‍या स्पर्धेतून माघार घेऊन येत्या नोव्हेंबर महिन्यात होणार्‍या ऑॅलिम्पिक क्वालिफायरवर लक्ष देण्याचा सल्ला भारताचे मुख्य कोच विजय शर्मा यांनी मीराबाई चानू हिला दिला होता. मीराबाई गेल्या मे महिन्यापासून पाठदुखीच्या समस्येशी झगडत आहे.

विजय म्हणाले,ङ्घमी महासंघाला अहवाल दिला आहे. आता महासंघाने निर्णय घ्यावा. इतक्या कमी वेळात अधिक वजन उचलणे योग्य नाही. ऑलिम्पिक पात्रता फेरीवर लक्ष दिल्यास देशाचा लाभ होईल. ऑलिम्पिक पात्रता फेरीचे आयोजन 1 नोव्हेंबरपासून होईल. मीराबाईच्या लिगामेंटमधील जखम अतिशय लहान असल्याने एमआरआय आणि सिटीस्कॅनद्वारे शोध घेता आला नाही.

दरम्यान भारोत्तोलन महासंघाचे सचिव सहदेव यादव यांनी मीराबाईला खेळविण्याचा निर्णय गुरुवारी होईल, असे सांगितले. मीराबाई आशियाडमध्ये सुवर्ण पदकाची प्रबळ दावेदार असल्याने तिच्या माघारीमुळे मोठे नुकसान होणार आहे. मणिपूरच्या या खेळाडूने मागच्यावर्षी नोव्हेंबरमध्ये विश्व स्पर्धेच्या 48 किलो गटात 194 किलो वजन उचलून सुवर्ण जिंकले होते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने सर्वोत्कृष्ट कामगिरीसह राष्ट्रीय विक्रमाची नोंद करीत सुवर्ण पदक पटकाले होते.

गेल्या आठवड्यात आराम वाटल्यानंतर तिनं मुंबईत पुन्हा सराव सुरू केला होता… परंतु, पुन्हा एकदा पाठदुखीचा त्रास सुरू झाला. मूळची मणिपूरच्या असलेल्या या 23 वर्षीय खेळाडूनं गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात विश्व चॅम्पियनशिपमध्ये 48 किलो वर्गात 194 किलो वजन उचलून सुवर्ण पदक आपल्या नावावर नोंदवलं होते. तिनं कॉमनवेल्थ गेम्समध्येही सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करत 196 किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकावले होते. हा एक राष्ट्रीय रेकॉर्डदेखील आहे.

LEAVE A REPLY

*