विवेकानंद स्कूल विजयी; ओरियन स्टेट बोर्ड उपविजयी

0
जळगाव । 17 वर्षा आतील स्पर्धा होणार मनपा स्तरीय 14 वर्षा आतिल फुटबॉल स्पर्धेला शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीड़ा संकुलवार मुंबई येथील क्रीड़ा संचालिका सौ सुरेखा चौधरी व डॉ अण्णासाहेब बेंडाले च्या क्रीड़ा संचालिका प्रो डॉ अनिता कोल्हे यांच्या हस्ते सुरवात करण्यात आली त्या वेळी फुटबॉल असो.चे फ़ारूक़ शेख,

मनपा क्रीड़ा अधिकारी किरण जावले व समन्वयक विवेक आडवाणी उपस्थित होते. विजयी व उप विजयी संघास व उत्कृष्ट खेळाडूस उप आयुक्त मनपा लष्मीकांत कहार, जिल्हा क्रीड़ा अधिकारी सुनंदा पाटिल, असो. सचिव फ़ारूक़ शेख, जैन स्पोर्ट्स चे अरविंद देशपांडे,माजी क्रीड़ा अधिकारी अरिहंत मिश्रा यांचे हस्ते परितोषिके देण्यात आली.

अब्दुल मोहसिन, लियाकत अली सय्यद, अजय वरचे, शाहिद शेख, मंथन खरात,अल्तमश शेख,अभिषेख पहुरकर, संजू कासेकर, गौरव ठाकुर आशुतोष शुक्ला हरप्रीत रंधवार यांनी पंच म्हणून कामगिरी पारपाडली.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक विवेक आडवाणी, सूत्रसंचालन रविन्द्र धर्माधिकारी तर आभार नरेंद्र चौहान यांनी मानले.

दि 4 ऑगस्ट रोजी झालेल्या सामान्यांचा निकाल – ए टी जांबरे स्कुल वि वि एल एच पाटील स्कुल (3-2) (पेनल्टी), ओरिअन सि बी एस इ स्कुल वि वि पोदार स्कुल (2-0), उज्जवल स्प्राऊटर वि वि एम ए आर अँग्लो उर्दू स्कुल (1-0), विवेकानंद प्रतिष्ठांन वि वि सेंट लॉरेन्स स्कुल (5-0), ओरिअन स्टेट बोर्ड वि वि रायसोनी इंग्लिश स्कुल (3-0), सेंट जोसेफ स्कुल वि वि झिपरु अण्णा स्कुल (7-0) ,

ओरिअन स्टेट बोर्ड वि वि उज्वल स्पराऊटर स्कुल (2-0), विवेकानंद प्रतिष्ठान वि वि सेंट जोसेफ स्कुल ( 2-0), उपांत्य सामने : ओरिअन स्टेट बॉर्ड वि वि ए टी जांबरे स्कुल ( 4-1) ( पेनल्टी), विवेकानंद प्रतिष्ठान वि वि ओरिअन सि बी एस इ (1-0), अंतिम सामना- विवेकानंद प्रतिष्ठान वि वि ओरिअन स्टेट बोर्ड (2-0). उत्कृष्ट खेळाडू- जयेश अग्रवाल (विवेकानंद प्रतिष्ठान) व हेमंत धांडे (ओरिअन स्टेट बोर्ड)

LEAVE A REPLY

*