विराटची एकाकी झुंज अपयशी

0
बर्मिंगहॅम । इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा 31 धावांनी पराभव झाला. विराट कोहलीने अर्धशतक पूर्ण करत कडवी झुंज दिली पण तो बाद झाल्यानंतर भारताच्या विजयाच्या आशा मावळल्या. नंतर मोहम्मद शमी, इशांत शर्मा असे गडी बाद होत गेले आणि भारताचा डाव 162 धावांवर आटोपला.

विराटची झुंज अपयशी ठरली आणि भारताचा पराभव झाला. बेन स्टोक्सने 4, अँडरसन आणि ब्रॉडने 2-2, तर कुरान आणि रशीदने 1-1 बळी टिपला. अष्टपैलू कामगिरी करणार्‍या सॅम कुरानला सामनावीर घोषित करण्यात आले.या विजयासह इंग्लंडने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

आजचा चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा भारताला विजयासाठी 84 धावांची आवश्यकता होती. पण सामना सुरू होताच दिनेश कार्तिकला पहिल्याच षटकात अँडरसनने बाद केले आणि तिथून भारताची घसरण सुरू झाली. कर्णधार विराट कोहलीकडून क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. विराटने आपले अर्धशतक पूर्ण केले पण 51 धावांवर गोलंदाज बेन स्टोक्सने त्याला पायचीत केले.विराट कोहली आणि दिनेश कार्तिक यांनी आज दिवसाच्या खेळाला सुरुवात केली होती.

पण पहिल्याच षटकात भारताला धक्का बसला आणि दिनेश कार्तिक 20 धावांवर बाद झाला. कर्णधार कोहलीने झुंजार अर्धशतक ठोकले पण नंतर लगेच बेन स्टोक्सने त्याला पायचीत केले. कोहलीने 93 चेंडूत 51 धावा केल्या. त्याच षटकात मोहम्मद शमीदेखील बाद झाला. फिरकीपटू आदिल रशीद याने इशांत शर्माला (11) पायचीत केले. फिरकीपटू आदिल रशीद याने इशांत शर्माला पायचीत केले. हार्दिक पांड्याने काही काळ झुंज देत 61 चेंडूत 31 धावा केल्या. पण अखेर बेन स्टोक्सने त्याला झेलबाद केले आणि डावातील चौथा गडी टिपत सामना आपल्या संघाला जिंकवून दिला.त्याआधी तिसर्‍या दिवसअखेर भारत इंग्लंड कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवसअखेर भारताने 5 बाद 110 धावांपर्यंत मजल मारली होती. तिसर्‍या सत्राच्या सुरुवातीला भारताला इंग्लंडचे 3 गडी बाद करायचे होते. या दरम्यान, तळाच्या सॅम कुर्रान या फलंदाजाने अप्रतिम फटकेबाजी करून आपले अर्धशतक (63) साजरे केले.

त्याच्या या खेळाच्या बळावर इंग्लंडने 180 धावांपर्यंत मजल मारली आणि भारतापुढे 194 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यांनतर भारताच्या दुसर्‍या डावाची सुरुवात काहीशी निराशाजनक झाली. मुरली विजय (6), शिखर धवन (13), लोकेश राहुल (13), अजिंक्य रहाणे (2) आणि रविचंद्रन अश्विन (13) या पाच खेळाडूंना फार काळ खेळपट्टीवर तग धरता आले नाही. दिनेश कार्तिकने कर्णधार कोहलीला साथ दिली आणि दिवसाचा खेळ संपेपर्यंत टिकून फलंदाजी केली. इंग्लंडचा दुसरा डाव सर्वबाद 180 धावांवर आटोपला होता.

पहिल्या आणि दुसर्‍या सत्रात आजच्या दिवसात झटपट 6 गडी गमावल्यानंतर अखेर इंग्लंडच्या डावाला स्थैर्य आले होते. तळाचे फलंदाज आदिल रशीद आणि सॅम कुर्रान यांनी डावाला आकार दिला. कुर्रानने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लडने 180 धावांपर्यंत मजल मारली. तर या डावात इशांत शर्माने 5, अश्विनने 3 आणि उमेश यादवने 2 गडी बाद केले. तत्पूर्वी, भारताचा डाव सर्वबाद 274 धावात आटोपला. एका वेळी बलाढ्य वाटणार्‍या 287 धावांचा पाठलाग करताना विराटने अप्रतिम 149 धावांची खेळी केली.

उमेश यादवने 16 चेंडूत नाबाद 1 धाव, तर इशांत शर्माने 17 चेंडूत 5 धावा काढत त्याला चांगली साथ दिली. याशिवाय, इतर फलंदाज आपला प्रभाव पडू शकले नाहीत.

इंग्लंडतर्फे कुर्रानने 4 तर रशीद, स्टोक्स आणि अँडरसनने 2-2 गडी बाद केले.

LEAVE A REPLY

*