मनपा कर्जमुक्त करुन दाखवावी! – सुरेशदादा

0
जळगाव । महापालिका निवडणुकीत भाजपाने वर्षभरात महापालिका कर्जमुक्त करण्याचे आश्वासन दिले आहे. ते आश्वासन पाळून त्यांनी महापालिका कर्जमुक्त करून दाखवावी, आम्हाला आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते माजी आ.सुरेशदादा जैन यांनी दिली.

माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची प्रतिक्रीया जाणून घेतली असता त्यांनी सांगितले की, जळगावच्या जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. गेल्या 35-40 वर्षापासून महापालिकेवर आमची सत्ता होती.

त्यामुळे यावेळेला जनतेला परीवर्तन हवे होते. त्यामुळे भाजपाने विकासाबाबत जो विश्वास जनतेला दाखविला आहे तो त्यांनी सार्थ ठरवावा. तसेच महापालिका कर्जमुक्त करून विकासनिधी आणावा असेही जैन यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*