जनतेला दिलेला शब्द पाळणार! – ना. गिरीश महाजन

0
जळगाव । महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. जळगावच्या जनतेने भाजपावर विश्वास दाखवला असल्याने विकासाबाबत दिलेला शब्द पाळणार असल्याची प्रतिक्रिया जलसंपदामंत्री ना.गिरीश महाजन यांनी दिली.

महापालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यात भाजपच्या 57 जागा निवडून आल्या. तब्बल 40 वर्षानंतर जळगाव महापालिकेत भाजपाची सत्ता आली असून जळगावातील जनतेने भाजपावर विश्वास दाखवला आहे. भाजपाच्या विजयाबाबत प्रतिक्रिया देतांना ना.गिरीश महाजन यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास असल्याचे शिक्कामोर्तब केले आहे. आम्ही विकासाचे राजकारण केले आहे. द्व्रेषाचे राजकारण आम्ही कधीही केले नाही. जळगावातील जनतेला विकास हवा आहे. वर्षभरात जळगाव महालिकेला कर्जमुक्त करून 200 कोटी रूपयांचा निधी आणून जळगावात रखडलेली विकासकामे पूर्ण करणार असल्याचे ना.महाजन यांनी सांगितले. जळगावात प्रथमच भाजपाला मोठे यश मिळाले असून बहुमताचा आकडा आम्ही सहज पार केला आहे. गेल्या 15 वर्षात जळगाव शहराचा विकास खुंटला होता. आम्ही शब्द दिला आहे, वर्षभरात महापालिका कर्जमुक्त करून विकासासाठी 200 कोटी रूपये निधी मुख्यमंत्र्यांकडून घेणार आहे. त्यामुळे जळगावकरांना दिलेला शब्द आम्ही पाळणार असल्याचे ना.गिरीश महाजन यांनी सांगितले.

असे आहेत विजयी उमेदवार
भाजप – प्रिया जोहरे, सरिता नेरकर, दिलीप पोकळे, रुख्सानाबी खान, कांचन सोनवणे, नवनाथ दारकुंडे, गायत्री शिंदे, किशोर बाविस्कर, मिना सपकाळे, दत्तात्रय कोळी, रंजना सपकाळे, प्रविण कोल्हे, चेतन सनकत, भारती सोनवणे, चेतना चौधरी, मुकुंदा सोनवणे, अमित काळे, मंगला चौधरी, शुचिता हाडा, धिरज सोनवणे, सीमा भोळे, दिपमाला काळे, अश्विन सोनवणे, सचिन पाटील, लताताई भोईटे, प्रतिभा पाटील, चंद्रशेखर पाटील, मयुर कापसे, प्रतिभा कापसे, प्रतिभा देशमुख, विजय पाटील, सुरेश सोनवणे, शोभा बारी, हसीनाबी शेख, कुलभुषण पाटील, पार्वताबाई भिल, उषा पाटील, सिंधुताई कोल्हे, ललित कोल्हे, उज्वला बेंडाळे, गायत्री राणे, सुरेखा तायडे, ज्योती चव्हाण, जितेंद्र मराठे, अंजनाबाई सोनवणे, रेखाताई पाटील, सुरेखा सोनवणे, सदाशिव ढेकळे, राजेंद्र पाटील, भगत बालानी, रजनी अत्तरदे, रेश्मा काळे, मनोज आहुजा, मिनाक्षी पाटील, रंजना सोनार, सुनिल खडके, विश्वनाथ खडके.

शिवसेना – विष्णू भंगाळे, राखीताई सोनवणे, ज्योती तायडे, नितीन लढ्ढा, मनोज चौधरी, नितीन बरडे, बंटी जोशी, सुनिल महाजन, जयश्री महाजन, शेख शबानाबी सादीक, प्रशांत नाईक, ईबा पटेल, लताताई सोनवणे, गणेश सोनवणे, जिजाबाई भापसे.

एमआयएम – रियाज बागवान, सुन्नाबी देशमुख, सैईदा शेख.

LEAVE A REPLY

*