जळगावला सीमा भोळे महापौरपदाच्या दावेदार

0
जळगाव । महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने 57 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले असून महापौर पदाच्या प्रबळ दावेदार आ.राजुमामा भोळे यांच्या पत्नी नगरसेविका सिमा भोळे असणार आहेत. तसेच माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेविका ज्योती चव्हाण, भारती सोनवणे या देखील दावेदार असणार आहेत.

महानगरपालिका 2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीत 75 जागांपैकी 38 जागा महिलांच्या आहेत. त्यापैकी 10 जागा ओबीसी प्रवर्गासाठी आहेत. जळगाव मनपात यंदा महापौर पद हे ओबीसी महिला प्रवर्गासाठी निश्चित झाले आहे. त्यामुळे पहिल्या अडीच वर्षात ओबीसी महिला प्रवर्गाचे आरक्षण असल्यामुळे आ.राजूमामा भोळे यांच्या पत्नी नगरसेविका सिमा भोळे या महापौर पदाच्या दावेदार असणार आहेत.

यंदाच्या निवडणुकीत भाजपाच्या 10 महिला ओबीसी प्रवर्गातील आहेत. यामध्ये प्रभाग क्र.1 ब मधील सरिता नेरकर, प्रभाग क्र.3 क मधील गायत्री शिंदे, प्रभाग क्र.4 ब मधील भारती सोनवणे, प्रभाग क्र.6 ब मधील मंगला चौधरी, प्रभाग क्र.10 ब मधील शोभा बारी, प्रभाग क्र.11 ब मधील उषा पाटील, प्रभाग क्र.13 ब मधील ज्योती चव्हाण, प्रभाग क्र.17 अ मधील मिनाक्षी पाटील आणि प्रभाग क्र.14 अ मधील रेखाताई पाटील यांचा समावेश आहे.

ना.गिरीश महाजन, आ.राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने निवडणूक लढविली. मनपावर सत्ता काबीज करण्यासाठी आ.राजूमामा भोळे यांनी अथक परिश्रम घेतले. त्यामुळे या परिश्रमाची परतफेड म्हणून सिमा भोळे यांना महापौरपद देण्याची जास्त शक्यता आहे.

तसेच दुसर्‍यांदा निवडून आलेल्या भाजपाच्या नगरसेविका तथा माजी स्थायी समिती सभापती ज्योती चव्हाण त्याबरोबरच कैलास सोनवणे यांच्या पत्नी नगरसेविका तथा माजी उपमहापौर भारती सोनवणे या देखील दावेदार आहेत. मात्र सिमा भोळे यांची महापैारपदासाठी वर्णी लागण्याची अधिक शक्यता आहे.

LEAVE A REPLY

*