विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये श्रीकांतची विजय सलामी

0
नानजिंग । भारताचा अग—णी पुरुष बॅडमिंटन खेळाडू किदांबी श्रीकांतने चांगली सुरुवात करत मंगळवारी जागतीक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. तर भारताची सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा जोडीने मिश्रीत युगलमध्ये विजय मिळवून बादफेरीत प्रवेश केला.

अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकल वर्गातील पहिल्या फेरीत श्रीकांतने आयरलँडच्या नहात गुयेनला 21-15, 21-16 अशा सरळ सेटने पराभूत करुन पुढील फेरीत प्रवेश केला. दुसर्‍या फेरीत श्रीकांतचा सामना स्पेनचा पाब्लो आबियानशी होईल.

सात्विकसाईराज आणि पोनप्पाच्या जोडीने दुसर्‍या फेरीत जर्मनीची मार्क लाम्सफुस आणि इसाबेल हेर्टरिकच्या जोडीला 10-21, 21-17, 21-18 ने पराभूत करुन प्री-क्वार्टर फाईनल (बादफेरीत) प्रवेश केला आहे. येथे या जोडीलचा सामना मलेशियाची जोडी गोह सून हुआत आणि शेवोन जेमीशी होईल.

मिश्रीत युगल वर्गात प्रणव जेरी चोपडा आणि एन. सिक्की रेड्डी या जोडीला मात्र इंडोनेशियाची हाफिज फैजल आणि ग्लोरिया इमानुएलेच्या जोडीने 21-16, 21-4 ने पराभूत केले.

LEAVE A REPLY

*