सुचेता चित्रे, डॉ.वृषाली पाटील यांची आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड

जळगावच्या नाहिद दिवेचा यांचीही राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी

0
जळगाव । गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या वरिष्ठ (व्हेटर्न्स) बॅडमिंटन स्पर्धेत जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. डॉ.वृषाली पाटील यांनी 45 वर्षांवरील वयोगटात महिला एकेरीत उपविजेतेपद, तर नहिद दिवेचा यांच्या साथीने महिला दुहेरीत विजेतेपद व मिश्र दुहेरीत उपविजेतेपद पटकावले. सुचेता चित्रे यांनी 65 वर्षांवरील वयोगटात एकेरी व दुहेरीत कांस्यपदक तर मिश्र दुहेरीत उपविजेतेपद पटकावले. डॉ.पाटील व चित्रे यांची ऑगस्ट 2019 मध्ये पोलंड मध्ये होणार्‍या आंतरराष्ट्रीय वरिष्ठ स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

गोव्यातील मडगाव येथे 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय स्पर्धा पार पडली. 45 वर्षे वयोगटात डॉ.पाटील व दिवेचा यांनी महिला दुहेरी स्पर्धेच्या अंतिम फेरीत गुजरातच्या काजल धनवाणी व रचना गर्ग या जोडीचा 21-8, 21-10 असा सरळ पराभव केला. चित्रे यांनी 65 वर्षे वयोगटात मिश्र दुहेरीत अशोक शर्मा यांच्या साथीने उपविजेतेपद पटकावले. आंतरराष्ट्रीय स्पर्धा पोलंडमधील कॅटोविक येथे पार पडेल. त्यासाठी भारताच्या वरिष्ठ संघाचे नेतृत्व केरळची पारुल रावत करणार आहे.

ज्युनिअर जिल्हा स्पर्धा

जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनतर्फे 16 व 17 फेबु्रवारी दरम्यान जिल्हा क्रीडा संघाच्या हॉलमध्ये जिल्ह्यातील 17 ते 19 वर्षा वयोगटातील मुला-मुलींसाठी ज्युनिअर बॅडमिंटन स्पर्धा पार पडेल. विजेता व उपविजेता खेळाडूंना प्रायोजक ‘जैन’कडून बक्षिसे देण्यात येतील. माहितीसाठी विनीत जोशी 8275170705, वैशाली दिक्षीत 8007847268 यांच्यांशी संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

*