इस्लामपुरमधील बालिकेला पळवून नेण्याचा प्रयत्न

0
जळगाव । शहरातील इस्लामपुरा मध्ये राहणार्‍या 12 वर्षीय बालिकेला पळवून नेण्याच्या उद्देशाने एका युवकाने घरात प्रवेश केला. परंतू याचवेळी बालिकेने आरडओरड केल्याने या युवकाने याठिकाणावरून पळ काढला. ही घटना भरदिवसा सकाळी 11.20 वाजेच्या सुमारास घडली.

या प्रकारामुळे घाबरलेल्या बालिकेने घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला. नागरिक व कुटुंबियांनी आजुबाजूच्या परिसरात बालिकेने सांगितलेल्या वर्णनाच्या युवकाचा शोध घेतला. परंतू तो युवक मिळून आला नाही. या घटनेची माहिती कळताच शनिपेठ पोलिस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.

याबाबत प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेली माहिती अशी की, इस्लामपुरमध्ये राहणारी मशिरा फरगीन शेख मोहम्मद आरीफ वय 11 ही बालिका घरापासून जवळच असलेल्या के.के गर्ल्स उर्दू हायस्कुलमध्ये इयत्ता 7 वी मध्ये शिकते. तीची आई सकाळी बाहेर गेली होती. त्यामुळे मशिरा मावशीच्या घरी होती. तिच्या मावशीचे घर अपार्टमेंटमध्ये दुसर्‍या मजल्यावर असून मशिराला शाळेत जाण्याचे असल्याने मावशीने तिला जेवण घेवून घे असे सांगून कामानिमित्त बाहेर गेली.

काही वेळानंतर मशिरा घरात एकटी होती. काही वेळानंतर शाळेत जाण्यासाठी ती तयारी करण्यासाठी उठली व दरवाजा बंद करीत असतांना एक 35 ते 40 वयोगटातील युवक अचानक तिच्या घरात आला. त्या युवकाने मशिराला गुचचूप बैठ असे इशार्‍याने खुणविले. युवक घरात येताच मशिराने आरडाओरड करण्यास सुरवात केली. बाजुच्या घरात झोपलेला अझहर बाहेर येईपर्यंत तो युवक अपार्टमेंटमधून खाली उतरून सराफ बाजाराकडे पळाला.

घाबरलेल्या अवस्थेत बालिकेने घडलेला
प्रकार कुटुंबियांना सांगितला
मशिराने आरडाओरड करताच पांढरे कपडे घातलेला युवक अपार्टमेंटमधून उतरून खाली पळाला. त्यानंतर मशिराने घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला. दरम्यान तिला पळवून नेण्याचा उद्देशाने हा युवक घरात आला असल्याचे बालिकेच्या कुटुंबियांनी सांगितले.

चोरीच्या उद्देशाने आला असल्याचा अंदाज
इस्लामपुरा भाग दाट वस्तीचा आहे. याठिकाणावरून बालिकेला पळवून नेणे अशक्य आहे. दरम्यान तो युवक चोरीच्या उद्देशाने अपार्टमेंट घुसला असावा. परंतू त्याठिकाणी त्याला बालिका दिसल्याने तो पळून गेला असेल असा अंदाज काही नागरिकांनी वर्तविला. घटनेची माहिती कळताच शनिपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस पोलिस निरीक्षक प्रविण वाडीले,उपनिरीक्षक बी.बी.शिंदे, दिनेशसिंग पाटील, नरेंद, ठाकरे, गिरीष पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून बालिकेसह तिच्या कुटुंबियांकडून माहिती जाणून घेतली.

LEAVE A REPLY

*