धनादेश अनादर झाल्याने महिलेला तीन लाखांच्या दंडाची शिक्षा

0
जळगाव । शहरातील एकता रिटेल किराणा मर्चंट नागरी सहकारी पतसंस्थेला दिलेला 2 लाख 10 हजारांचा धनादेश अनादरीत झाल्याने महिलेविरूध्द पतसंस्थेतर्फे न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. त्यावर निर्णय होवून न्यायालयाने महिलेला कैदेऐवजी 3 लाख रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एकता पतसंस्थेतून घेतलेल्या मनिषा अभयकुमार बाघरेचा या महिलेने कर्ज घेतले होते. कर्जाच्या परतफेडीसाठी त्यांनी पतसंस्थेला दिलेला 2 लाख 10 हजारांचा धनादेश अनादरीत झाल्याने पतसंस्थेच्यावतीने महिलेविरूध्द न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्यात आला होता.

जिल्हा न्यायालयाचे न्या. बी.डी. गोरे यांच्या न्यायालयात कामकाज होवून न्यायालयाने मनिषा बाघरेचा या महिलेला कैदेऐवजी 3 लाख रूपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंडाच्या रकमेपैकी 5 हजार रूपये शासनाकडे जमा ठेवून उर्वरित रक्कम 2 लाख 95 हजार रूपये नुकसान भरपाई म्हणून पतसंस्थेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पतसंस्थेतर्फे अ‍ॅड.श्रीओम अग्रवाल अ‍ॅड.सुशील जैन यांनी कामकाज पाहिले.

LEAVE A REPLY

*