बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक करणार्‍याला अटक

0
जळगाव । मुक्ताईनगर तालुक्यातील मानेगाव शिवारात असलेल्या शेतीची कागदपत्रे बनावट तयार करून दुसरीच व्यक्ती उभी करून विक्री केल्याप्रकरणी दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्हात संशयित आरोपी आज सथानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळ तालुक्यातील पानाचे कुर्‍हे येथून अटक केली आहे.

बाजीराव उर्फ संभाजी पाटील रा. जलचक्र ता. मुक्ताईनगर यांने मुक्ताईनगर तालुक्यातील मानेगाव शिवारात असलेल्या शेतलीची कागदपत्रे बनावट तया करून दुसर्‍या विक्री केल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित आरोपी बाजीराव उर्फ संभाजी पाटील हा पानाचे

कुर्‍हे येथे असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनिल कुराडे यांच्या पथकातील रविंद्र पाटील, शरीफ काझी, विकास वाघ, युनुस खान, दिपक पाटील यांनी सापळा रचून बाजीराव उर्फ संभाजी पाटील याला ताब्यात घेतले.

LEAVE A REPLY

*