प्रस्थापितांचे पोलिसांशी संगनमत; खोट्या गुन्ह्यात अडकविले

0
जळगाव । दि.31 । प्रतिनिधी-प्रस्थापितांचे शेकडो कोटी रुपयांचे गैरव्यवहार व भ्रष्टाचार उघडकीस आल्याने या प्रस्थापितांनी पोलिसांशी संगनमत करून मोबाईलचा आयएमईआय नंबर कॉपी करून तसेच बोगस आधारकार्ड बनवून सीम कार्ड घेवून माझ्या घराच्या परिसरात येवून अश्लिल संदेश पाठवून खोट्या गुन्हात अडकविले असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत केला.

सामजिक कार्यकर्ता दिपक गुप्ता यांनी दिलेली माहिती अशी की, 17 फ्रेबुवारी रोजी प्रेमचंद नामक व्यक्तीने चोपडा येथून दिपकगुप्ता अपंग असून ते सीमकार्ड घेण्यास येवून शकत नाही असे सांगून विक्रेत्याकडून फार्म घरी नेवून त्यावर स्वाक्षरी करीत सिमकार्ड घेतले.

हे सीमकार्ड सुरु करून घराच्या परिसरात येवून रात्री 12 ते 1 वाजेच्या दरम्यान अनेकांना अश्लिल संदेश पाठवून मला खोटया गुन्हात अडकविले.

सुरवातीला विलेपार्ले पोलिस स्टेशन, नवीमुंबई सीपीपी, पुणे शिवाजी नगर पोलिस स्टेशन, नाशिक मुंबई नाका पोलिस स्टेशन या ठिकाणी गुन्हे दाखल करून साडेचार महिने अडकवून ठेवण्यात आले.

माझ्यासह कुटुंबियांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासामुळे या सर्व गुन्हाची पोलिस महासंचालक यांच्याकडे सीबीआय,सीआयडी चौकशीची तसेच सामुहिक आत्मदहनाची देखील परवानगी मागितली आहे.

तत्कालीन डीवायएसपींची होती धमकी
तत्कालीन गृह शाखेचे डीवायएसपी महारु पाटील यांच्याकडे माहिती मागण्यासाठी गेलो असता, त्यांनी खोटया गुन्हात अडकविण्याची धमकी दिली असल्याचा आरोप देखील दिपककुमार गुप्ता यांनी केला.

तसेच गुन्हांमध्ये अडकविण्यात पोलिसांचा देखील सक्रीय सहभाग असल्याचा दावा देखील गुप्ता यांनी यावेळी केला.

सायबर क्राईमचा बळी
आयएमईआय नंबर कॉपी करून अश्लिल संदेश पाठविले जात असल्याने सायबर क्राईमचा बळी ठरला असल्याने मोबाईलधारक सुरक्षित नसल्याचा आरोप गुप्ता यांनी करून सायबर विभागावर देखील टिका करून तक्रार दुर होत नसल्याने सायबर विभाग निष्क्रिीय असल्याचे त्यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*