सेरेना विल्यम्सची अंतिम फेरीतधडक

0
लंडन । अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने जर्मनीच्या ज्युलिया जियॉर्जिसचा पराभव करून विम्लडनच्या महिला एकेरी स्पर्धेतील अंतिम फेरीत धडक मारली आहे.

सेरेनाने ज्युलियाचा 6-2, 6-4 असा पराभव करीत फायनलमध्ये धडक मारली आहे. सेरेना विल्यम्सची आता फायनलमध्ये जर्मनीच्या अँजेलिक कर्बरशी लढत होणार आहे.

सेरेना विल्यम्सने क्वार्टर फायनलमध्ये इटलीच्या केमिला जियॉरजीचा तीन सेटमध्ये 3-6, 6-3, 6-4 असा पराभव केला होती. एक तास 43 मिनिटे चाललेल्या या सामन्यात सेरेनाने पहिला सेट गमावला होता. परंतु, 23 वेळा ग्रँड स्लॅम विजेता असलेल्या सेरेनाने दमदार पुनरागमन करीत पुढील दोन सेटमध्ये विजय मिळवून सेमीफायनलमध्ये धडक मारली होती.

आज सेमीफायनलच्या सामन्यात सेरेनानं ज्युलियावर 6-2, 6-4 अशी मात करीत फायनलमध्ये धडक मारली.सेरेना विल्यम्सची आता फायनलमध्ये जर्मनीच्या अँजेलिक कर्बरशी लढत होणार आहे.

LEAVE A REPLY

*