आषाढस्य प्रथम दिवसे

0
‘कान्येषु नाटकं रम्यं तत्र रम्या शकुन्तला’ असे मोठ्या गर्वाने म्हटले जाते. महाकवीने केवळ तीनच नाटके लिहिलीत तरी तो जगप्रसिध्द झाला. शेक्सपीअरला मात्र जगप्रसिध्द होण्यासाठी शेकडो नाटके लिहावी लागलीत. भारताचा शेक्सपीअर म्हणून जगात ओळख झाली त्यात महाकवीने शेक्सपीअरला मोठे केले असे म्हणतांना महाकवी हा शेक्सपीआरला सुध्दा वरचढ होता हे निश्चित. अभिज्ञान शाकुंतलाला रसिक जनांनी नाट्य मंदिराचा कळस संबोधले आहे.

तीन नाटकांपेक्षाही अडिच महाकाव्ये श्रेष्ठ दर्जाची ठरतात. ज्या काव्यांनी कालिदासाला महाकवि पदवी प्रदान केली. महाकवीला, निसर्गाचे निसर्गसौदर्यांची अत्यंत आवड होती आणि त्यामुळे त्याने आपलं पहिलं काव्य ‘ऋतुसंहार’ हे निसर्गाचे पूजन करून आपल्याला सादर केले आहे. त्या त्या ऋतुंमध्ये निसर्गात स्थित्यंतर होते, बदल, मानवी मनावर होणार परिणाम, प्रेम जीवन याचे चित्रण करतांना आपण प्रत्यक्ष अनुभव करत आहोत असे खास करून जाणवते. त्यानंतरचे खंडकाव्य अतिशय गाजलेले, रसिकतेच्या जगात मान्यता पावलेले आहे.

या मेघदूत काव्याला एवढी लोकप्रियता लाभण्याचे कारण असे की प्रतिभा ही अपूर्व शक्ती निर्माणक्षम असते. जी वस्तू अस्तित्वात नाही, ती आपल्या प्रतिभेच्या सहाय्याने निर्माण करू शकते. अस्तित्वात नसलेल्या कृतीला जन्म देते. शक्ती तत्व नवनवोन्मेष शालिनी प्रतिभा. या मेघदूत काव्याचे वैशिष्ट्ये म्हणजे श्रेष्ठ दजाची प्रतिभा होय. कमाती ही प्रकृतिकृपणाश्चेत नाश्चेतनेषु. प्रेम व्याकुळ झालेल्या प्रत्येकालाच चेतन आणि अचेतन यातील फरक कळत नसतो, तेच यक्षाचे बाबत झाले. अतिशय सुंदर प्रतिभा महाकवीची यात दिसून येते. कुमार संभव ही भगवान शंकराच्या पार्वती परिणयाची कहाणी आहे.

‘रघुवंश’ हे महाकाव्य एका वंशाची कहानी आहे. महाभारताचा आदर्श महाकवीने आपल्यासमोर ठेवला आहे. एकूण 19 सर्गाच्या 1569 श्लोक मध्ये जवळ जवळ 22 ते 24 राजांची कहानी त्यात आलेली आहे. काही राजपूरूष आपल्या सर्वांचे परिचयाचे आहेत, काही राजपुरूष आपल्या परिचयाचे नसतील असेही आहेत. या सगळ्यांचं कार्यकाळाचा परिचय या महाकाव्यात करून दिलेला आहे. आरंभच मुळी कालिदासाने पार्वती परमेश्वराला वंदन करून केलेला आहे. जगाचे पिता/माता असणार्‍या महाकवी वाक आणि अर्थ यांच्या रूपात बघतो. पार्वती परमेश्वराप्रमाणेच वाक आणि अर्थ एकमेकांशी एकरूप असतात.

दोघांचे अविभाज्य संबंध आहेत तेव्हा कोणत्याही साहित्य काव्य निर्मित करित असतांना वाक आणि अर्थ यांचे एकरूपतेचे नाते जपावेच लागते तेव्हा ती निर्मिती श्रेष्ठ दर्जाची होते. कालिदासाला अग्निवर्ण दाखवून रघुवंश समाप्त करावयाचे होते. कदाचित कालिदासाचे आयुष्य संपल्यामुळे हे महाकाव्य अपुरे राहिले असावे.

संस्कृत काव्यसृष्टीमध्ये रघुवंशासारखे महाकाव्य नाही. जीवनाचे आदर्श जे आहे ते रेखाटले आहेत. निर्दोष रचना आहे. अलंकार वैभव जे आहे ते सर्व यात आहे. परिपक्व अवस्थेत निर्माण झालेले अपूर्ण महाकाव्य दुसरे नाही.

आदर्श राज्यकल्पना साकार केली असून रघुवंशातील राजे वैयक्तिक जीवन कसे जगत होते. राजकिय जीवन कसे जगत प्रजेवर पुत्रवत प्रेम कसे करित तसेच प्रजेच्या सुखासाठी स्वयंसुखाची अभिलाषा कशी बाजूला ठेवत, याचा आदर्श महाकाव्यात वर्णिलेला आहे. कालिदास रघुवंशात शृंगारकवी राहिला नाही, विलासाचा नाही, निसर्गाचा नाही, पण तो ‘राष्ट्रकवी’ या पदवीपर्यंत पोहोचला. राष्ट्रांच्या कल्याणाचं स्वप्न त्याने आपल्या प्रतिभेने उभे केले आहे.
राष्ट्रकवीला विनम्र अभिवादन…
*कोषाध्यक्ष जेष्ठ ब्राह्मण विचार मंच.
*माजी अध्यक्ष अष्टभुजा ज्येषठ नागरिक संघ.
*माजी चिटणीस शु.य.ब्रा. मध्यवती मंडळ, पुणे
-सुरेश एकनाथ कुळकर्णी

LEAVE A REPLY

*