उमेदवारांना आयात करणे हा व्यावहारीक खेळ!

0
जळगाव । कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीसाठी भावनिक विषय असुन निवडणुकीसाठी उमेदवारांना आयात करणे हा व्यावहारिक खेळ असल्याचे अजब विधान भाजपाचे मंत्री ना. गिरीश बापट यांनी आज एका पत्रकार परीषदेत केले.

राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री ना. गिरीश बापट आज जळगाव दौर्‍यावर होते. या दौर्‍यात त्यांनी सायंकाळी भाजपा कार्यालयाला भेट देऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली. कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीसाठी प्राण असल्याचा उपदेशही त्यांनी बैठकीत दिला. दरम्यान बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परीषदेत कार्यकर्ता या प्रश्नावर बोलतांना मात्र त्यांनी अजब विधान करीत गोंधळ उडविला. ते म्हणाले की, कार्यकर्ता हा आत्मा आहे.

भारतीय जनता पार्टीसाठी कार्यकर्ता ही ताकद आहे. त्यामुळे कार्यकर्ता जपणे हा भावनिक विषय आहे. असे असले तरी निवडणुकीवेळी कार्यकर्त्यापेक्षा उमेदवारांना आयात करणे हा व्यावहारीक खेळ असल्याचे अजब विधान करून त्यांनी गोंधळ उडविला. निवडणुकीसाठी तिकीट देतांना 10 कार्यकर्ते समोर असतात. पण प्रत्येकाला तिकीट देणे शक्य नसते. तसेच काही ठिकाणी परीस्थीती पाहुन उमेदवारी द्यावी लागते. अशावेळी पार्टीचे नुकसान होणार नाही म्हणुन उमेदवारांना आयात करावे लागते अशी सारवासारवही त्यांनी नंतर केली.

खडसेंच्या कोर्टकचेर्‍या सुरू असल्याने बोलणे उचित नाही
राज्याचे माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी सरकारमधील एक मंत्री त्रास देत असल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यावर ना. बापट यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी सांगितले की, सध्या खडसेंच्या कोर्ट कचेर्‍या सुरू असल्याने त्यांच्याबाबतीत बोलणे उचित होणार नाही. ते आमचे ज्येष्ठ नेते आहे. लवकरच सगळं व्यवस्थीत होईल असेही ना. बापट यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*