चिमुकलीची हत्त्या करणार्‍या आदेशबाबा गजाआड

0
जळगाव । शहरातील समतानगर परिसरात राहणार्‍या 9 वर्षीय चिमुकलीवर दुषकर्म करून तिच्या हत्या केल्याप्रकरणी संशयित भोंडू आदेशबाबा याला एमआयडीसी पोलिसांनी धानोरा-मोहाडी येथील नागझिरी शिवारातून घाटीतून अटक केली आहे. दरम्यान या आदेशबाबाने अद्याप गुन्हाची कबुली दिलेली नाही. पोलिस त्यांची रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी करीत होते.

समतानगर परिसरातील धामणगववाडा परिसरातील टेकडीवर 9 वर्षीय चिमुकलीचा गोणपाटात मृतदेह आढळून आला होता. मृतदेह अर्धनग्नावस्थेत आढळून आल्याने तसेच मृतदेहावर ओरबाडल्याच्या खुणा असल्याने अत्याचाराचा संशय व्यक्त केला होता. ही चिमुकली दि.12 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून घरातून बेपत्ता होती. रात्रभर कुटुंबियांसह नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. दरम्यान त्याच रात्री रामानंद नगर पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दि.13 रोजी सकाळी या चिमुकलीचा घरापासून काही अंतरावर असलेल्या टेकडीजवळ एका महिलेला गोणपाटात चिमुकलीचा मृतदेह दिसून आला होता.

मृतदेह अर्धानग्नावस्थेत असल्याने तसेच मृतदेहावर नखांनी ओरबडल्याच्या जखमा असल्याने चिमुकलीवर अत्याचार झाला असल्याचा संशय व्यक्त केला. याप्रकरणी कुटुंबियांसह नातेवाईक व पोलिसांनी परिसरातील रहिवाशी असलेला आनंदा तात्याराव सांळुखे उर्फ आदेशबाबा वय 60 यांच्यावर संशय व्यक्त केला होता. चिमुकलीच्या मृत्यूप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला होता. सुरुवातीला अपहरणाच्या गुन्ह्यात देखील आदेशबाबावरच पोलिसांना संशय होता.

रात्रीपासून पोलिस आदेशबाबाच्या मागावर
संशयित आदेशाबाबा घटना घडताच फरार झाला होता. दरम्यान आदेशबाबाच्या घराजवळ चिमुकलीच्या डोक्याचा क्लिप बाबाच्या घराजवळ आढळून आला होता. त्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर संशय होता. सकाळपासून शहरातील सर्वच पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी त्यांच्या मागावर होते.

एमआयडीसी पोलिस स्टेशनचे संदिप पाटीलांना मिळाली माहिती
संशयित आदेशबाबा धानोरा- मोहाडी येथील नागझिरी शिवारातील नाशेरी घाटीत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक संदिप पाटील यांना मिळाली. संदिप पाटील यांच्यासह एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या कर्मचार्‍यांनी सकाळीच त्याला घाटातील नागाई जोगाई मंदिरापासून काही अंतरावरुन ताब्यात घेवून जळगावी आणले.

LEAVE A REPLY

*